शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जूनअखेरला लंडनला जाणार होतो; तिकीटही काढले, अपघाताच्या भीतीने प्रवास केला रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 18:09 IST

अपघाताचे भयानक चित्र डोळ्यांसमोर वारंवार येत असल्याने पुढील एक-दाेन महिने विमान प्रवास करणे टाळायचे प्रवाशांनी सांगितले आहे

पुणे : मी जूनअखेरला कामानिमित्त लंडनला जाणार होतो. तिकीटदेखील काढले होते. परंतु गुरुवारी (दि. १२) अहमदाबाद येथे घडलेल्या विमानअपघातामुळे मनामध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील प्रवास रद्द केला आहे. अपघाताचे भयानक चित्र डोळ्यांसमोर वारंवार येते. त्यामुळे पुढील एक-दाेन महिने विमान प्रवास करणे टाळायचे ठरवले आहे, असे विमान प्रवासी ॲड. अभिषेक उपाध्ये यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यामुळे पुढील महिने विमान प्रवासी घटतील, असा दुजोरा हवाई तज्ज्ञांनीदेखील दिला आहे.

अहमदाबाद - लंडनला जाणारे बोइंग विमान कोसळून गुरुवारी २४१ विमान प्रवाशांचा मृत्यू झाला. यामुळे भारतीय हवाई क्षेत्राच्या असलेल्या विश्वासार्हतेला हादरा बसला आहे. देशात ७०० ते ८०० विमाने असून, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे होतात. परंतु बाेइंग विमानाच्या अपघातामुळे भीतीपोटी अनेक प्रवासी पर्यायी साधनांचा वापर करण्याची तयारी केली असून, एकत्र कुटुंबाने जाणारे असतील तर ते टाळून वेगवेगळ्या विमानातून प्रवास करण्याचे नियोजन करत असल्याचे बोलत आहेत. तसेच विमान अपघातामुळे विविध घटकांवर परिणाम होणार असून, याचे आकर्षण असणारे तरुण-तरुणी दुसरा पर्याय निवडतील, शिवाय हवाई प्रवासासाठी असलेल्या विमा कंपन्यांकडून विम्याचे दर वाढविण्यात येतील, असा दावा हवाई अभ्यासक करत आहेत.

अभ्यासक म्हणतात...

-देशांतर्गत प्रवासासाठी नागरिक वंदे भारत, शताब्दी, राजधानी अशा रेल्वे गाड्यांना प्राधान्य देतील.-पुढील किमान पाच ते सहा महिने विमान प्रवाशांची संख्या लाखोने घटणार असून, याचा परिणाम विमान सेवेवर होणार आहे.-हवाई क्षेत्रात पायलट, एअर होस्टेस या क्षेत्रात येणारे तरुण-तरुणी पर्यायी आणि सुरक्षित क्षेत्र निवडतील.-विमा कंपन्यांकडून प्रवाशांची प्रचंड लूट होईल.-कामानिमित्त वारंवार विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी होईल.-विशेषत: ज्येष्ठांची संख्या घटणार असून, ते प्रवास करण्याचे टाळतील.

माझे अनेक नातेवाईक, मित्र परिवार परदेशात स्थायिक आहेत. कधी कामामुळे किंवा कधी भेटण्याच्या निमित्ताने अधूनमधून परदेशात जाणे होते. दिवाळीच्या आसपास सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात अमेरिकेत जायचा प्लॅन पण केला होता, परंतु कालच्या अपघातामुळे तो कॅन्सल केला आहे. विमान अपघाताच्या घटनेमुळे मन अतिशय व्यथित झाले असून, सध्याच्या परिस्थितीत तरी कोठे जायचा विचार नाही. जे प्रवासी मृत पावले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. - आनंद सप्तर्षी, प्रवासी

माझ्या विविध कामांमुळे महिन्यातून एक-दोनदा परदेशात जाणे होते. परंतु काल जी घटना घडली, ती मनाला हादरवून सोडणारी आहे. फोटो पाहिले की अंगावर काटे येतात. कालपासून पाहुण्यांकडून माझी चाैकशी केली जाते. परंतु जीवन म्हणजे कटपुतळी बाहुली आहे. या अपघातामुळे मनावर खूप परिणाम झाला आहे. त्यामुळे पुढील काही महिने विमान प्रवास करायचे टाळणार आहे. - उषा सूर्यवंशी, व्यावसायिक

गुरुवारी जी घटना घडली आहे, ती भयानक आणि मनावर दीर्घकाळ परिणाम करणारी आहे. विमान प्रवास सुरक्षित आणि सुपर आहे. परंतु अशा घटनेमुळे मनाचे खच्चीकरण होते. विमान प्रवास करताना हजार वेळा विचार मनात येतात. परंतु नियोजन केलेला प्रवास आता रद्द केला आहे. - ॲड. अभिषेक उपाध्ये, प्रवासी

 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAccidentअपघातAir Indiaएअर इंडियाairplaneविमानpassengerप्रवासीAirportविमानतळ