शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

ताैक्ते वादळामुळे पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 18:06 IST

ग्रामसेवकांना गावातच राहण्याच्या सूचना

ठळक मुद्देपडझड झाल्यास त्वरित मदतीसाठी जेसीबी व मजूर ठेवण्याचे आदेश

पुणे: ताैक्ते वादळाचा जिल्ह्यात फारसा फटका बसणार नसला, तरी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या शक्यतेमुळे जिल्हा परिषदेतर्फे घाटमाथ्यावरील गावांना सतर्क राहण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत. यासोबतच तत्काळ मदत देण्यासाठी ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, गटविकास अधिकाऱ्यांना त्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी राहण्याचे आदेश त्यांनी दिले आहे. गावांत, रस्त्यात वादळी वाऱ्यामुळे घरे किंवा झाडे पडल्यास तत्काळ मदतीसाठी व वाहतूक सुरळीत करण्यासाठी ग्रामपंचायतीने एक जेसीबी व मजुरांची व्यवस्था करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

कोकण किनारपट्टीवर रविवारी ताैक्ते चक्रीवादळ धडकले. या वादळामुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा आणि पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. घाट माथ्यावरील गावांना याचा धोका असल्याने प्रशासकीय यंत्रणेला सतर्क राहण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सूचना दिल्या आहेत. रविवारी सकाळपासूनच जिल्ह्याच्या सर्व भागात ढगाळ हवामान व वादळी वारे सुटले होते. यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले होते, तर घरांचे पत्र उडाली.

वादळाच्या शक्यतेमुळे ग्रामसेवकांनी गावातच मुख्यालयात राहावे. ज्या शासकीय इमारतींची दुरवस्था झाली आहे किंवा त्यांची छपरे कमकुवत आहे.  अशा इमारतीपासून कर्मचाऱ्यांनी लांब राहावे. तसेच, छपरे उडून जाऊ नयेत यासाठी त्यावर वजनदार वस्तू ठेवाव्या जेणेकरून ते वाऱ्याच्या वेगाने उडणार नाहीत. घरे पडल्यास किंवा रस्ते बंद झाल्यास ते लवकर सुरू करण्यात यावे यासाठी ग्रामपंचायतींनी एका जेसीबीची व्यवस्था करावी. तसेच मजुरांचीही व्यवस्था करावी जेणे करून त्वरित रस्ता वाहतुकीसाठी खुला करता येईल. तत्काळ मदतीसाठी धोकादायक ठिकाणांना अधिकाऱ्यांनी भेटी देऊन त्या ठिकाणी मदतीची योग्य व्यवस्था करण्यात यावी. तालुकास्तरावर कंट्रोल रूमची स्थापना करून तेथून सर्व परिस्थिती हाताळण्यात यावी. अधिकाऱ्यांची, तसेच सभापतींची वाहने मदत पोहोचवण्यासाठी तयार ठेवली जावी, अशा आदी सूचना करण्यात आल्या आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तयार ठेवा

नागरिकांना प्रथोमोपचार देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रम, उपकेंद्रावर योग्य व्यवस्था करण्यात यावी. जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी रुग्णवाहिका तयार असाव्या तसेच चालकांनाही तयार ठेवा. कुठल्याही आपत्कालीन  परिस्थिती त्या तयार असायला हव्या अशा सूचना आरोग्य अधिकाऱ्यांना वादळाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रWaterपाणीHealthआरोग्य