शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मौनातूनच वारकऱ्यांचे वादावर कोरडे; वारीच्या परंपरेला गालबोट लागू नये अशी अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 19:46 IST

मंदिराच्या व्यवस्थेसाठी साठ वर्षांपूर्वी संस्थानाची स्थापन करण्यात आली. दर पाच वर्षांनी बदलणारी विश्वस्त ही व्यवस्था आहे. तर सोहळ्यामध्ये न चुकता वंशपरंपरागत योगदान देणारी समांतर व्यवस्था त्यापूर्वीपासूनच कार्यरत आहे.

पुणे : शेकडो वर्षांची परंपरा असलेली पंढरीची वारी अनेक संकटे आली तरी अविश्रांत सुरूच आहे. उन्हाळे, पावसाळे, कितीही संकटे आली तरी न चुकता सुरूच आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपूर्वी विश्वस्तांच्या वागणुकीवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांमध्ये नाराजी असली तरी भाष्य न करता मौनातूनच कोरडे ओढले. विश्वस्त हे केवळ व्यवस्था असून, पंढरीची वारी ही अवस्था आहे. या प्रकारामुळे सज्जन सोहळ्याला असज्जनतेचे गालबोट लागू नये, अशी अपेक्षा वारकरी व्यक्त करत आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुण्यात विसावल्यानंतर विश्वस्त योगी निरंजन यांच्या वागणुकीवरून वादंग निर्माण झाला. यानंतर निरंजननाथ यांनी खुलासा करत माफी मागण्याचा प्रयत्न केला. सोहळा प्रमुख भावार्थ देखणे यांनीही यावर पडदा टाकत असे प्रकार यापुढे घडणार नाहीत, अशी ग्वाही दिली. मात्र, व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे वारीत चालणाऱ्या वारकऱ्यांसह अनेकांमध्ये नाराजीचा सूर उमटला. वारकऱ्यांनी याबाबत कोणतेही भाष्य न करता त्यांनी मौनातूनच कोरडे ओढले आहेत.वारी ही शेकडो वर्षांपासून सुरू आहे. अनेक उन्हाळे, पावसाळे तसेच कोरोनासारखी संकटे आली तरी वारी सुरूच आहे. त्यामुळे असे प्रकार केवळ पेल्यातील वादळच ठरत आहेत. वारकऱ्यांना राजकारणात काडीचाही रस नाही. विश्वस्त मानकरी आणि प्रशासनामधील अंतर्गत वाद, हेवेदावे त्यांनी सोहळ्यात आणू नयेत, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

मंदिराच्या व्यवस्थेसाठी साठ वर्षांपूर्वी संस्थानाची स्थापन करण्यात आली. दर पाच वर्षांनी बदलणारी विश्वस्त ही व्यवस्था आहे. तर सोहळ्यामध्ये न चुकता वंशपरंपरागत योगदान देणारी समांतर व्यवस्था त्यापूर्वीपासूनच कार्यरत आहे. त्यामुळे विश्वस्तांनी अशा प्रकारचे वाद ओढवून घेऊ नयेत. कार्यकाळ संपल्यानंतर अनेक विश्वस्त पायी वारीत दिसतही नाहीत. अनेकांच्या घराण्यात पायी वारीचा इतिहासही नाही. त्यामुळे वारीमध्ये असे वाद निरर्थक असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. वारीमध्ये पालखी मुक्कामी विसावल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची आरती केली जाते. त्यानंतर कोणत्याही दिंडीमध्ये स्वतंत्र आरती केली जात नाही. मात्र, योगी निरंजननाथ यांनी या प्रकारानंतर सारवासारव करताना माउलींच्या आरतीनंतर दिंडीकऱ्यांना आपापल्या दिंडीत आरती करायची असल्याने विलंब होत असल्याचा दावा केला होता. मात्र, विसाव्याची आरती झाल्यानंतर पुन्हा आरती करतात का, असा सवालही केला. माहिती घेऊनच वारीबाबत वक्तव्य करावे, अशी अपेक्षाही वारकरी व्यक्त करत आहेत.

पंढरपूरकडे प्रस्थान ठेवण्याच्या दिवशी गुरुवारची पालखी काढली जाते. गेली अनेक वर्षे अशी पालखी दुपारी काढण्याची प्रथा आहे. याबाबत कोणताही लिखित नियम नाही. मात्र, काही जणांच्या आग्रहास्तव पालखी उशिरा काढल्याने रात्री विसाव्याला उशीर झाला. परिणामी दुसऱ्या दिवशी सकाळी पुण्याकडे प्रस्थान ठेवताना पालखी एक तास उशिरा मार्गस्थ झाली. या प्रकाराबाबतही वारकऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे. त्यामुळे काहींच्या सांगण्यावरून वारीच्या परंपरेला तडा जाणार नाही याची काळजी घ्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड