घरबसल्या रॅप गाण्यातून अनुभवता येणार वारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:08 IST2021-07-19T04:08:38+5:302021-07-19T04:08:38+5:30
विठ्ठल व वारकरी यावर बनवलेले हे पहिलेच रॅप सॉंग आहे. हे गाणे निरंजन पेडगावकर, वैभव चव्हाण, रॉकसन यांनी लिहिले, ...

घरबसल्या रॅप गाण्यातून अनुभवता येणार वारी
विठ्ठल व वारकरी यावर बनवलेले हे पहिलेच रॅप सॉंग आहे. हे गाणे निरंजन पेडगावकर, वैभव चव्हाण, रॉकसन यांनी लिहिले, गायले आहे. या तिघांसह सुमारे ४० ते ५० कलाकार घेऊन चित्रित करण्यात आलेल्या आणि घरबसल्या वारीचा आनंद देणाऱ्या या रॅप सॉंगचे दिग्दर्शन विशाल सांगळे व संजा यांनी केले आहे. हे रॅप गाणे तयार करताना शिवशंभो भजनी मंडळाचे (घिसरेवाडी) सहकार्य लाभले. गाणे बोपदेव घाट, भिवरी गाव व पुण्यातील विविध ठिकाणी चित्रित करण्यात आले आहे.
------
आषाढी वारीचे आपल्या महाराष्ट्रात खूप महत्त्वाचे स्थान आहे. कोरोनामुळे मागील वर्षी वारी झाली नाही व यावर्षी देखील खूप कमी लोकांना वारीत जाण्याची परवानगी मिळाली आहे. ''खास रे टीम''ने विठ्ठलावर केलेले रॅप साँग एक अनोखा प्रयोग आहे. गाण्याने लोकांना विठ्ठल दर्शनाची अनुभूती घेता येईल.
- नरेंद्र फिरोदिया, निर्माते