हिंगणे खुर्द येथे भंगार साहित्याच्या गोदामाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:11 IST2021-04-10T04:11:25+5:302021-04-10T04:11:25+5:30

अजिंक्यनगर सोसायटीच्या मागे एक भंगार साहित्याचे गोदाम आहे. त्या ठिकाणी दीड हजार स्केअर फूट जागेत ते गोदाम असून, त्या ...

Warehouse fire at Hingane Khurd | हिंगणे खुर्द येथे भंगार साहित्याच्या गोदामाला आग

हिंगणे खुर्द येथे भंगार साहित्याच्या गोदामाला आग

अजिंक्यनगर सोसायटीच्या मागे एक भंगार साहित्याचे गोदाम आहे. त्या ठिकाणी दीड हजार स्केअर फूट जागेत ते गोदाम असून, त्या ठिकाणी सर्व भंगारचे साहित्य जमा करण्यात आले होते. शुक्रवारी (दि. ९) मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाला फोन आल्यानंतर सिंहगड रोड अग्निशमन केंद्रातील दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दरम्यान, अग्निशमन जवानांनी पाण्याचा मारा करत संपूर्ण आग विझवली. या वेळी येथे जमा केलेले सर्व भंगाराचे साहित्य जळून खाक झाले. येथे दहा कामगार राहत होते. त्यांना वेळीच आगीबाबत समजल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सिंहगड रोड अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख सुरेश उमराटकर, तांडेल शिवाजी मुजुमले, जवान प्रमोद मरळ, शिवाजी आटोळे, विलास घडशी, संतोष नलावडे तर चालक देशमुख यांनी ही कामगिरी बजावली.

Web Title: Warehouse fire at Hingane Khurd