वानवडीत तरुणावर वार
By Admin | Updated: July 1, 2014 00:02 IST2014-07-01T00:02:04+5:302014-07-01T00:02:04+5:30
किरकोळ कारणावरून तरुणावर धारदार हत्याराने वार करण्यात आल्याची घटना वानवडीमध्ये रविवारी रात्री घडली.

वानवडीत तरुणावर वार
>पुणो : किरकोळ कारणावरून तरुणावर धारदार हत्याराने वार करण्यात आल्याची घटना वानवडीमध्ये रविवारी रात्री घडली. ही भांडणो सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावरही हल्ला करण्यात आला. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तुषार श्यामराव शेलार (वय 21, रा. आदर्शनगर, हांडेवाडी रस्ता, हडपसर) व शुभम बंड अशी जखमींची नावे आहेत.
या प्रकरणी स्वप्नील रायकर, शुभम रायकर या दोघांसह चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेलार याचे दुकान रायकर याने भाडय़ाने घेतलेले आहे. या दुकानावरून दोघांमध्ये वाद झाले होते. रविवारी रात्री शेलार हा बंड याच्यासोबत काळेपडळ येथील हॉटेल जयभवानीसमोर गप्पा मारत उभा होता.
त्या वेळी त्याच्या मोबाईलवर एक फोन आला. शेलार याला मैदानात ये असे सांगण्यात आले. त्यानुसार, शेलार आणि बंड हॉटेलमागील मैदानामध्ये गेले. तेथे मित्रशी बोलत असतानाच स्वप्नील आणि शुभम तेथे आले. त्यांनी शेलारशी वाद घालायला सुरुवात केली.
त्या वेळी या दोघांनी धारदार हत्याराने शेलारवर हल्ला चढवला. ही भांडणो सोडविण्यासाठी गेलेल्या बंड याच्यावरही आरोपींनी वार केले. गंभीर जखमी झालेल्या या दोघांना नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. (प्रतिनिधी)
घायवळ टोळीतील 5 जणांना कोठडी
4पुणो : येरवडा कारागृहात कुख्यात गुंड नीलेश घायवळ याची तपासणी केल्याचा राग मनात धरून हवालदाराला मारहाण केल्याप्रकरणी घायवळ टोळीतील 5 जणांची रवानगी न्यायालयाने येरवडा कारागृहात केली आहे.
4मोंटय़ा ऊर्फ मनोज ऊर्फ मोन्या देवराम भिलारे (वय 22, रा. दारवली, ता. मुळशी), सागर ऊर्फ अमर राजेंद्र वेलापूरकर (वय 21, रा. कव्रेनगर, कोथरूड), चिंटय़ा ऊर्फ अजय आनंद पवार (वय 21, रा. कोथरूड चौक), टिन्या ऊर्फ नीलेश अभिमन्यू सोनवणो (वय 22, रा. वारजे माळवाडी) आणि महेश ऊर्फ राकेश गुलाब कुंबरे (वय 19, रा. शास्त्रीनगर, कोथरूड) अशी आरोपींची नावे आहेत.
4या प्रकरणात संतोष धुमाळ याला पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही. प्रकाश परशुराम धुमाळ (वय 49, रा. जेल वसाहत) यांनी फिर्याद दिली आहे. नागपूर चाळ येथील फेमस क्लॉथ सेंटरसमोर 23 मे रोजी दुपारी 1.3क् वाजता ही घटना घडली. फिर्यादी हे येरवडा कारागृहात हवालदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी घायवळची झडती घेतली होती. त्या वेळी धुमाळ व घायवळ यांच्यात बाचाबाची झाली होती. याचा राग मनात धरून घायवळ टोळीतील 5 जणांनी फिर्यादींना रस्त्यात अडवून मारहाण केली होती.