नाटकाविषयी आत्मीयता हवी
By Admin | Updated: March 24, 2015 00:31 IST2015-03-24T00:31:00+5:302015-03-24T00:31:00+5:30
नाटकाविषयी आत्मीयता, मनापासून काम करण्याची इच्छा असायला हवी, असे मत राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे संचालक प्रा. डॉ. वामन केंद्रे यांनी व्यक्त केले.

नाटकाविषयी आत्मीयता हवी
पुणे : नाट्यक्षेत्रात येण्यासाठी कोणत्याही पार्श्वभूमीची आवश्यकता नाही. पण या क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर नाटकाविषयी आत्मीयता, मनापासून काम करण्याची इच्छा असायला हवी, असे मत राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे संचालक प्रा. डॉ. वामन केंद्रे यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या ललित कला केंद्र व गुरुकुल भारतातील विविध संस्थांच्या सहकार्याने नाट्याभ्यास वर्ग आयोजित करण्यात आला आहे. या वगार्च उद्घाटन सोमवारी ज्योत्स्ना भोळे सभागृहात झाले. त्या वेळी डॉ. केंद्रे बोलत होते. प्रा. डॉ. शमिक बंदोपाध्याय, ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर, दिग्दर्शक मकरंद साठे, डॉ. शुभांगी बहुलीकर उपस्थित होते.
केंद्रे म्हणाले, ‘‘नाट्यक्षेत्रात येण्यासाठी शहरीप्रमाणेच ग्रामीण भागातील तरुणदेखील उत्सुक असतात. अशा तरुणांचे स्वप्न साकार करण्यासाठी ललित कला केंद्र नेहमीच त्यांच्या पाठीशी उभी राहील.’’
डॉ. शमिक बंदोपाध्याय म्हणाले, ‘‘नाट्यक्षेत्रात बदल होण्यास सुरुवात झाली आहे. आजचे तरुण नवीन संकल्पना, संधी, विचार, बदलत्या परिस्थितीचा विचार घेऊन उत्साहाने पुढे येत आहेत.’’
मकरंद साठे यांनी लिहिलेल्या मराठी रंगभूमीच्या ‘तीस रात्री’ या पुस्तकाचे प्रकाशन याप्रसंगी करण्यात आले. नाट्याभ्यास वर्ग २६ मार्चपर्यंत सुरू आहे. महाराष्ट्रातील पारंपरिक लोककला, एकविसाव्या शतकातील वास्तववादाची पुनर्व्याख्या तसेच अभिनय यांसारख्या विषयांवर व्याख्याने होणार आहेत. (प्रतिनिधी)