भटक्या कुत्र्यांचा युवतीवर हल्ला
By Admin | Updated: July 11, 2014 23:11 IST2014-07-11T23:11:14+5:302014-07-11T23:11:14+5:30
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मळईवस्तीवरील प्रतीक्षा सत्यवान इंगळे ही युवती गंभीर जखमी झाली असून तिला 2क् ते 25 वेळा कुत्र्यांनी चावा घेतला

भटक्या कुत्र्यांचा युवतीवर हल्ला
खळद : वाळुंज (ता.पुरंदर) येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मळईवस्तीवरील प्रतीक्षा सत्यवान इंगळे ही युवती गंभीर जखमी झाली असून तिला 2क् ते 25 वेळा कुत्र्यांनी चावा घेतला असून जखमा खोलवर असल्याचे समजते.
ही युवती 1क् जुलै रोजी कॉलेजवरून घरी आल्यानंतर सायंकाळी 4.3क् वाजण्याच्या सुमारास आपल्या म्हेत्रेमळा येथील शेतावर जात असताना पाच ते सहा कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला, हा हल्ला इतका भीषण होता, की या हिंस्र कुत्र्यांनी या युवतीला पाच ते दहा फूट ओढत नेले होते. या वेळी आपला जीव वाचविण्यासाठी जिवाच्या आकांताने ओरडणा:या या युवतीची आरोळी ऐकून येथील सुनंदा लक्ष्मण म्हेत्रे ही महिला धावून आली व या महिलेच्या धाडसामुळे या मुलीची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका झाली. यानंतर तातडीने या मुलीला उपचारासाठी सासवडच्या सरकारी दवाखान्यात नेण्यात आले; पण तिला झालेल्या जखमांची खोली पाहता तिला ससून पुणो येथे उपचारास नेण्याचे सांगितले. सध्या या मुलीची प्रकृती स्थिर आहे. (वार्ताहर)