शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात सीमा भिंत कोसळली ; धनकवडी भागातील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 18:34 IST

सावरकर चौकातील उंचावरील भागातील  निर्मोही बंगला आणि फुलवंती अपार्टमेंट यांच्यातील सामाईक भिंत शुक्रवारी पहाटे ५.३० वाजता कोसळली.

 पुणे : सावरकर चौकातील उंचावरील भागातील  निर्मोही बंगला आणि फुलवंती अपार्टमेंट यांच्यातील सामाईक भिंत शुक्रवारी पहाटे ५.३० वाजता कोसळली. फुलवंती अपार्टमेंटच्या तळमजल्यावर भिंतीचा राडारोडा पडून सदनिकेत अडकून पडलेल्या महिलेला खिडकीचे गज कापून अग्निशमन जवानांनी बाहेर काढले.धनकवडी शेवटचा बस थांब्यापासून काही अंतरावर सावरकर चौकात दुमजली निर्मोही बंगला आहे त्यात चार सदनिका आहेत. या बंगल्यालगत सखल भागात फुलवंती अपार्टमेंट ही इमारत आहे. निर्मोही अपार्टमेंट मधील तळमजल्यावरच्या भागात अक्षय पवार राहतात. पवार यांच्या टाँयलेट व बाथरूमचा भाग सीमाभिंती बरोबर फुलवंती अपार्टमेंटमधील तळमजल्यावर असलेल्या चंद्रकांत पासलकर यांच्या दरवाजावर पडला. त्यामुळे पासलकर यांचे कुटुंब दरवाजा बंद झाल्याने आत अडकून पडले होते. अग्निशामक केंद्रातील जवानांनी खिडकी चे लोखंडी गज कापून त्यांना बाहेर काढले. यावेळी कात्रज अग्निशामक केंद्राचे ताडेल ढवळे, ड्रायव्हर शाबिर शेख , फायरमन  वसंत भिलारे , किरण पाटील, तेजस मांडवकर,  धीरज जगताप, श्रीकांत वाघमोडे , प्रतीक शिर्के उपस्थित होते.

 

 फुलवंती अपार्टमेंट व निर्मोही बंगाला या दोन्ही इमारतींचे बांधकाम साधारण तीस वर्षापुर्वीची आहे. यामधील फुलवंती अपार्टमेंट या इमारतीमध्ये अठरा फ्लॅट आहेत. सीमा भिंत पन्नास फुट लांब आणि साधारण पंधरा फुट उंचीची आहे. कमकुवत झालेला वीस फूटाचा भाग पहाटे अचानक कोसळला. या दोन्ही इमारतीतील सभासदांनी बैठक घेवून दुरूस्तीसाठी विचारविनीमय केला होता. परंतु पावसाळी परिस्थिती असल्याने थोडे दिवस थांबण्याचे ठरले होते. परंतु त्या अगोदरच ही घटना घडली.घटनास्थळी सकाळी स्थानिक नगरसेवक विशाल तांबे , बाळासाहेब धनकवडे, अश्विनी भागवत, वर्षा तापकीर तसेच धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त युनूस पठाण , वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राजू दुल्लम, आरोग्य निरीक्षक धनाजी नवले, दिनेश सोनवणे उपस्थित होते. तसेच बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता उमेश शिद्रुप यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक्षक अभियंता युवराज देशमुख यांना वस्तुस्थिती सांगितली. तसेच आमदार भिमराव तापकीर यांनी संभाव्य धोका टाळण्यासाठी महापालिकेने भिंत उभारून द्यावी अशी मागणी केली.

टॅग्स :AccidentअपघातDhankawadiधनकवडीRainपाऊस