शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील रस्त्यांवर वेगवान वाहनांमुळे चालणे मुश्किल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 12:24 IST

रात्री चालणे असुरक्षित, अनेक भागात पदपथांची दुरवस्था

ठळक मुद्दे‘परिसर’ संस्थेने शहरातील एक हजार पादचाऱ्यांच्या सर्वेक्षणामध्ये सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित

पुणे : रस्त्यांवरील वाहनांची गर्दी, वाहनांचा वेग, बेशिस्तपणा, अपघात अशा विविध कारणांमुळे शहरातील रस्त्यांवरून चालण्याची भीती वाटत असल्याचे पादचाऱ्यांचे म्हणणे आहे. प्रामुख्याने अनेक महिलांनी पदपथावरून चालणे सुरक्षित वाटत नसल्याचे सांगितले. पथदिवे नसणे, लोकांचा दृष्टिकोन आदी कारणांमुळे रात्री चालणे असुरक्षित असल्याचेही काही महिलांनी स्पष्ट केले.‘परिसर’ संस्थेने शहरातील एक हजार पादचाऱ्यांच्या सर्वेक्षणामध्ये सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित केला होता. अनेक भागात पदपथांची दुरवस्था असल्याने चालणे कठीण होते. पण, पदपथ चांगले असूनही आवश्यक सुविधा नसल्याने चालणे टाळत असल्याचे अनेकांनी सांगितले. विशेषत: त्यामध्ये महिलांचा समावेश अधिक होता. शहरातील रस्त्यांवरून चालणे असुरक्षित का वाटते, या प्रश्नावर सुमारे २५ टक्के जणांनी वाहनांच्या वेगाचे कारण सांगितले. तसेच, जवळपास तेवढ्याच जणांनी अपघातीची भीती व वाहनांची गर्दी खूप असल्याचे कारण दिले. बेशिस्त चालक व पदपथावर जागा नसल्याने असुरक्षित वाटत असल्याचेही काहींनी नमूद केले. सुमारे ३२.१ टक्के महिलांनी पदपथावरून चालणे सुरक्षित वाटत नसल्याचे सांगितले. दिवे नसल्याने रात्रीची भीती वाटते, लोकांचा दृष्टिकोन, गर्दी, चोरांची भीती अशी विविध कारणे महिलांनी दिली आहेत. पथदिव्यांचा मुद्दा १०.७ टक्के महिलांनी उपस्थित केला.पदपथांवर सुविधा उपलब्ध करून दिल्यास चालणे कठीण जाणार नाही, असे बहुतेकांनी सांगितले. शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी ७२.६ टक्के पादचाऱ्यांची आहे. जवळपास तेवढ्याच पादचाऱ्यांनी कचरापेटी व बसण्यासाठी बेंच-शेडची व्यवस्था असावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच स्वच्छता, अडथळामुक्त रेलिंग, दिशादर्शक चिन्हे, सुशोभीकरणाची गरजही अनेकांनी व्यक्त केली आहे. चांगले पदपथ मिळणे हा नागरिकांचा हक्क आहे. या हक्कासाठी मोहीम सुरू करण्याची गरज असल्याचे मत सुमारे ८६ टक्के जणांनी व्यक्त केले आहे. .........शहरातील रस्त्यांवरून चालणे असुरक्षित का वाटते?कारण                           टक्केवारी वाहनांचा वेग                    २४.८अपघाताची भीती            ११.८वाहनांची गर्दी                  १०.२बेशिस्त चालक                  ६.८ पदपथावर जागा नाही       ४.७...............पदपथांवर कोणत्या सुविधा असाव्यात?सुविधा                           टक्केवारीशौचालय                          ७२.६कचरा पेटी                        ७२.१बसण्यासाठी बेंच-शेड       ६७.६स्वच्छता                         ६६.६अडथळामुक्त                  ५६.२पथदिवे                           ४७.२रेलिंग                              ४३.४दिशादर्शक चिन्हे            ४२.७सुशोभीकरण                ३२.५................

टॅग्स :Puneपुणेroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकWomenमहिलाtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलर