शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनामुळे मनातील काव्य जागृत : मिलिंद गुणाजी; ‘नाते निसर्गाशी’चे पुण्यात प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 13:45 IST

पुण्यातील निसर्ग आणि वन्यजीव अभ्यासक प्रसिद्ध लेखक अनिल दामले लिखित आणि कॉन्टिन्टेल प्रकाशनतर्फे प्रकाशित ‘नाते निसर्गाशी’ या पुस्तकाचे प्रकाशन गुणाजी यांच्या हस्ते  झाले.

ठळक मुद्देजगात वावरल्याने व्यक्तिमत्त्वात एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास : मिलिंद गुणाजीपुस्तकाला आफ्रिकेतील प्रसिद्ध अभ्यासक ख्रिस्तोफर मॅक ब्राइड यांची लाभली प्रस्तावना

पुणे : पर्यटनामुळे आपल्या अनुभवाची कक्षा विस्तारते. त्यामुळे आपण ज्ञानी होतो. जगात वावरल्याने आपल्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास वृद्धिंगत होतो. माणसे वाचायची आणि ओळखायची सवय लागते. माझ्या मनातील कवी जागा करण्याचे श्रेय पर्यटनालाच आहे, असे  प्रसिद्ध अभिनेते आणि पर्यटक अभ्यासक मिलिंद गुणाजी यांनी सांगितले.   पुण्यातील निसर्ग आणि वन्यजीव अभ्यासक प्रसिद्ध लेखक अनिल दामले लिखित आणि कॉन्टिन्टेल प्रकाशनतर्फे प्रकाशित ‘नाते निसर्गाशी’ या पुस्तकाचे प्रकाशन गुणाजी यांच्या हस्ते  झाले, त्या वेळी ते बोलत होते. दामले सफारीचा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन आणि प्रकाशन सोहळा असा दुहेरी योग या वेळी साधण्यात आला. या पुस्तकाला आफ्रिकेतील प्रसिद्ध अभ्यासक ख्रिस्तोफर मॅक ब्राइड यांची प्रस्तावना लाभली असून, टांझनियातील सेरेंगेटी, बोर्नियोतील ओरांगडटान, केनियातील सावो पार्क गॅलॅपॅगोसचे अनोखे विश्व इस्रायलमधील इटराट तर बॉर्न फ्रीची लेखिका जॉय अ‍ॅडमझत अशा विविध विषयांवर आणि पर्यटनस्थळांची महती सांगणारे हे पुस्तक आहे. याप्रसंगी देवयानी अभ्यंकर-कुलकर्णी, अमोल दामले, रंजना दामले आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी काही पर्यटकांनी त्यांचे अनुभव मांडले. मिलिंद गुणाजी  म्हणाले, की  पर्यटनाची आवड मला माझ्या वडिलांनी लावली. योगायोगाने चित्रपटसृष्टी हेच करिअर झाल्याने व्यवसायाच्या निमित्ताने देशी-परदेशी बरीच भ्रमंती झाली. या व्यतिरिक्त  महाराष्ट्रातील गड-किल्ले, देवस्थाने देखील पालथी घातली. या सर्व पर्यटनातून माझ्या मनात दडलेले काव्य जागे झाले. या वेळी गुणाजी यांनी स्वरचित काही कवितांचे सादरीकरणदेखील केले. अनिल दामले यांनी पुस्तक लेखनामागची भूमिका विशद केली, तर देवयानी अभ्यंकर-कुलकर्णी अभ्यंकर यांनी प्रास्ताविक केले. रंजना दामले यांनी उपस्थितांचे आभार मानले. 

टॅग्स :Milind Gunajiमिलिंद गुणाजीPuneपुणे