पालिका प्रभागरचनेची प्रतीक्षा आता काही दिवसांचीच..!

By Admin | Updated: July 29, 2016 03:57 IST2016-07-29T03:57:53+5:302016-07-29T03:57:53+5:30

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या प्रभागरचनेकडे डोळे लावून बसलेले विद्यमान नगरसेवक तसेच निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना आता काही दिवसच प्रतीक्षा करावी

Waiting for municipal elections is just a few days! | पालिका प्रभागरचनेची प्रतीक्षा आता काही दिवसांचीच..!

पालिका प्रभागरचनेची प्रतीक्षा आता काही दिवसांचीच..!

पुणे : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या प्रभागरचनेकडे डोळे लावून बसलेले विद्यमान नगरसेवक तसेच निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना आता काही दिवसच प्रतीक्षा करावी लागणार आहे. ३१ जुलैपर्यंत निवडणूक आयोगाकडून प्रभागरचना व आरक्षण सोडतीबाबतचे वेळापत्रक जाहीर होईल. त्यानंतर लगेचच प्रभाग रचनेच्या कामाला सुरुवात होईल.
पालिकेच्या निवडणूक विभागाकडूनच याचे संकेत देण्यात आले. पुणे पालिकेसह राज्यातील १० महापालिकांची सार्वत्रिक निवडणूक पुढील वर्षाच्या सुरुवातीला होत आहेत. मुंबई वगळता अन्य सर्व पालिकांसाठी राज्य सरकारने चार वॉर्डांचा एक प्रभाग अशी नवी पद्धत जाहीर केली आहे. यात सर्व महापालिकांची प्रभागरचना नव्याने होईल. निवडणुकीसाठी अवघे काही महिने शिल्लक राहिलेले असताना प्रभाग रचनेबाबत मात्र काहीच हालचाल होत नव्हती. बहुतेकांची राजकीय गणिते त्यावर अवलंबून असल्याने ते याची वाट पाहत होते.

आयोगाने यापूर्वी सर्व पालिकांच्या निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना प्रभागरचनेसाठी गुगल मॅपचा उपयोग करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतर याबाबत काहीच हालचाल होत नव्हती. आता आयोगाकडून प्रभागरचना व प्रभागांची आरक्षण सोडत याचा कार्यक्रमच जाहीर होईल. त्यात प्रारूप प्रभागरचना कधी करायची, त्यावर हरकती, सूचना कधी मागवायच्या, त्याची सुनावणी कधी घ्यायची, अंतिम प्रभागरचना कधी जाहीर करायची, त्यानंतर त्याची आरक्षण सोडत कधी काढायची याचे वेळापत्रक असेल. त्यानुसार लगेचच कामाला सुरुवात होईल. साधारण २३ आॅगस्टपर्यंत अंतिम प्रभागरचना जाहीर होईल, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.

Web Title: Waiting for municipal elections is just a few days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.