शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

पूर्व पुण्याला पाण्याची प्रतीक्षा

By admin | Updated: January 5, 2015 00:54 IST

भामा-आसखेड धरणातून वडगाव शेरी मतदारसंघात पाणी आणण्याच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वल्गना करण्यात आल्या

विशाल दरगुडे, वडगाव शेरीभामा-आसखेड धरणातून वडगाव शेरी मतदारसंघात पाणी आणण्याच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वल्गना करण्यात आल्या. परंतु, निवडणुका पार पडल्यानंतर धरणातून पाणी आणण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीला अडथळ््यांची शर्यत करावी लागत आहे. भूसंपादनामुळे अनेक ठिकाणी कामे रखडल्याने वडगाव शेरी व नगर रस्ता परिसरातील नागरिकांना पाण्याची वाट पाहावी लागणार आहे. पालिकेने केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून सुमारे ३८० कोटींची भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याची योजना मंजूर केली आहे. त्यासाठी केंद्र ५० , राज्य शासनाकडून २० व पालिका ३० टक्के वाटा उचलणार आहे. जून २०१४ प्रकल्पाला सुरुवात झाली. जून २०१६ पर्यंत प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. साधारणत: भामा आसखेड धरणापासून ४२ किलोमीटर अंतरातून बंदिस्त वहिनीद्वारे २.८ टीएमसी पाणी आणले जाणार आहे. त्यामुळे मुख्य नगर रोडवरील कळस, संगमवाडी, येरवडा, लोहगाव, धानोरी, कल्याणीनगर, वडगाव शेरी, खराडी, चंदननगर या भागातील नागरिकांचा २०४१ पर्यंतचा पाण्याचा प्रश्न मिटणार असून, नागरिकांची टँकरमाफियांच्या कचाट्यातून सुटका होणार आहे.काही दिवसांपूर्वी वनविभागाने भूसंपादनास परवानगी दिली. मात्र, खासगी जागेतून जलवाहिनी टाकण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. भूसंपादनाअभावी योजनेचे काम संथ गतीने सुरू आहे. भामा-आसखेड धरणग्रस्तांचे आधी पुनर्वसन करा, त्यानंतर प्रकल्प राबवा, अशी भूमिका धरणग्रस्त शेतकऱ्यांनी घेऊन जलवाहिनी टाकण्याचे काम बंद पाडले आहे.बंदिस्त जलवाहिनीस तीव्र विरोध झाल्यानंतर भामा-आसखेडमधून पाणी योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या विरोधामुळे भामा-आसखेड जलवाहिनी प्रकल्प अडचणीत आला आहे.