शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

ससूनला मिळेना भरतीचा ‘डोस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 1:15 PM

ससून रुग्णालयामध्ये एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना त्या तुलनेत डॉक्टर्स, परिचारिका, तंत्रज्ञ व इतर पदांमध्ये वाढ झालेली नाही. तसेच मंजूर पदांपैकीही अनेक पदे रिक्त आहे.

ठळक मुद्दे७७५ रिक्त पदे : वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत पदे ‘जैसे थे’नुतनीकरण, नवीन शस्त्रक्रिया विभाग, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे यांसहरुग्णालयाचा कायापालट

राजानंद मोरे 

पुणे : ससून रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी मागील काही वर्षांत विविध पदांची भरती न झाल्याने तब्बल ७७५ पदे रिक्त आहेत. डॉक्टर, परिचारिका यांच्यासह विविध तांत्रिक पदेही रिक्त असल्याने रुग्णालयावरील ताण वाढू लागला आहे. त्यातच मागील काही वर्षांत नवीन पदेही मंजूर न झाल्याने पुर्वीच्या रचनेनुसार काम सुरू आहे. त्यामुळे सध्याच्या रुग्णसंख्येचा विचार करून तातडीने पदनिर्मिती व भरती करण्याची गरज निर्माण झाली आहे.रुग्णालयामध्ये पूर्वी केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांची संख्या अधिक होती. मात्र, मागील काही वर्षांत रग्णालयाने कात टाकली आहे. विविध विभागांचे नुतनीकरण, चांगल्या सोयीसुविधा, नवीन शस्त्रक्रिया विभाग, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे यांसह विविध कारणांमुळे रुग्णालयाचा कायापालट होत आहे. त्यामुळे आता मध्यमवर्गीय रुग्णांचा ओढाही वाढू लागला आहे. मागील वर्षी बाह्यरुग्ण विभागाने सात लाखांचा टप्पा पार केला आहे. तर आंतररुग्ण विभागातील रुग्णांची संख्याही पाऊण लाखाच्या पुढे गेली आहे. दैनंदिन शस्त्रक्रिया, विविध तपासण्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या दररोज दीडशेहून अधिक लहान-मोठ्या शस्त्रक्रिया होत आहेत. जानेवारी महिन्यात तब्बल १ लाख ७२ हजार विविध प्रकारच्या तपासण्या झाल्या होत्या. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना त्या तुलनेत डॉक्टर्स, परिचारिका, तंत्रज्ञ व इतर पदांमध्ये वाढ झालेली नाही. तसेच मंजूर पदांपैकीही अनेक पदे रिक्त आहे. रुग्णालयात वर्ग एकची आठ पदे मंजूर असून त्यापैकी केवळ दोन पदांवर पूर्णवेळ अधिकारी आहेत. त्यामध्ये प्रपाठक नेफ्रोलॉजी आणि सहायक प्राध्यापक समावेश आहे. वैद्यकीय अधिक्षक व उपअधिक्षक ही महत्वाची पदे रिक्त असून इतर दोघांच्याकडे अतिरिक्त भार देण्यात आला आहे. -----------मागील दोन वर्षांची रुग्णांची तुलनात्मक स्थितीवर्ष            २०१५            २०१७बाह्यरुग्ण विभाग     ६ लाख ४१ हजार          ७ लाख ८ हजारआंतररुग्ण विभाग    ६२ हजार ९३२           ७८ हजारशस्त्रक्रिया     १९ हजार ६५१                  ५७ हजार----------------------रुग्णालयाची सद्यस्थिती (जाने. २०१८) -एकुण बेड - १४९६एकुण दाखल रुग्ण - ७४१७दैनंदिन बाह्यरुग्ण - २५१९दैनंदिन शस्त्रक्रिया - १६६एकुण प्रयोगशाळा तपासण्या - १,७१,८९७-----------------ससून रुग्णालयातील रिक्त पदेवर्ग        मंजूर    भरलेली        रिक्तवर्ग १        ०८    ०२        ०६वर्ग २        १३५    ७२        ६३वर्ग ३        १५८२    १२३९        ३४३वर्ग ४        ८३४    ४७९        ३५५आयुर्वेद    १८    १०        ०८--------------------------------------एकुण        २५७७    १८०२        ७७५

टॅग्स :Puneपुणेsasoon hospitalससून हॉस्पिटल