'केळा'च्या पोस्टरनंतर आता वाघळवाडी गावाचा मतदानावर बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 02:40 PM2021-10-06T14:40:44+5:302021-10-06T14:48:58+5:30

सोमेश्वरनगर : येणाऱ्या निवडणुकीच्या मतदानावर  बहिष्कार टाकण्याबद्दल डीजीटन सोमेश्वरनगरमध्ये लागले आहेत. सोमेश्वर कारखाना निवडणुकीत कारखाना स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच कारखाना निवडणूकीमध्ये गावच बहिष्कार टाकण्याचा ...

waghalwadi village after banana poster boycott on polls someshwar sugar factory | 'केळा'च्या पोस्टरनंतर आता वाघळवाडी गावाचा मतदानावर बहिष्कार

'केळा'च्या पोस्टरनंतर आता वाघळवाडी गावाचा मतदानावर बहिष्कार

googlenewsNext

सोमेश्वरनगर : येणाऱ्या निवडणुकीच्या मतदानावर  बहिष्कार टाकण्याबद्दल डीजीटन सोमेश्वरनगरमध्ये लागले आहेत. सोमेश्वर कारखाना निवडणुकीत कारखाना स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच कारखाना निवडणूकीमध्ये गावच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेत आहे. वाघळवाडी ग्रामस्थांनी आज एकत्र येत गाव बैठकीत निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे.

सोमेश्वर कारखान्याची निवडणूक सध्या लागली आहे. यामध्ये वाघळवाडी गावास उमेदवारी देण्यात आली नाही. सोमेश्वर कारखाना उभारणीसाठी ग्रामस्थांनी स्वतःच्या मालकीच्या जमिनी कारखान्यासाठी विना मोबदला देण्यात आल्या. कारखाना उभारणीत मोठा सहभाग असलेल्या वाघळवाडी ग्रामस्थांना कारखाना स्थापन झाल्यापासून संचालकपदी संधी देण्यात आली नाही. सोमेश्वर कारखाना नोकर भरती मध्ये सुध्दा युवकांना वगळे जाते. कारखान्यात संधी मिळालेले संचालक आपल्या जवळचे युवक नोकरी लावण्यात प्राधान्य देतात. आजपर्यंत संचालक नसलेल्या वाघळवाडीकरना यामुळे नोकर भरतीत सुध्दा डावलले जाते. हे ग्रामस्थांनी अनेक वेळा बोलून दाखविले याकडे सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे बैठकीत ग्रामस्थांनी बोलून दाखविले.

60 वर्षे कारखाना स्थापन होऊन उलटून गेली तरी उमेदवारी दिली नसल्याने  या वर्षी उमेदवारी मिळेल अशी खात्री होती. परंतु पुन्हा डावल्या गेल्याने जवळपास तीनशे गावातील ग्रामस्थ आणि युवकांनी एकत्र येत सोमेश्वर कारखाना निवडणूकीत  मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. 

Web Title: waghalwadi village after banana poster boycott on polls someshwar sugar factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.