थर्मक्स कंपनीने आणली 'व्हीआरएस'; कंपनीतील पत्रकामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2020 08:31 PM2020-10-07T20:31:49+5:302020-10-07T20:33:24+5:30

'' कर्मचाऱ्यांना कागदावर जरी ऐच्छिक सेवानिवृत्ती दिसत आहे. परंतु प्रत्यक्षात तसे होईल की नाही हे सांगता येत नाही..''

'VRS' introduced by Thermax Company; Confusion among employees due to company Circuler letter | थर्मक्स कंपनीने आणली 'व्हीआरएस'; कंपनीतील पत्रकामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम

थर्मक्स कंपनीने आणली 'व्हीआरएस'; कंपनीतील पत्रकामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम

googlenewsNext
ठळक मुद्देकर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण

पिंपरी : थर्मक्स कंपनीत १० वर्षे सेवा पूर्ण झालेल्या किंवा ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व पात्र कर्मचार्‍यांच्या ऐच्छिक सेवानिवृत्ती योजनेला (व्हीआरएस) कंपनीच्या संचालक मंडळाने संमती दिली आहे. याविषयीचे परिपत्रक कंपनीने १ ऑक्टोबरला काढले आहे. 

कंपनी कायदा २०१५ च्या नियमानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. ही सेवानिवृत्तीची योजना ऐच्छिक असून, कंपनीत याबाबतचे पत्रक लावण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. ज्या कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, त्यांच्याकडे दुसरा पर्याय आहे, असे कर्मचारी ही योजना स्वीकारतील, असे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. 

नाव न सांगण्याच्या अटीवर कामगार युनियनचे एक पदाधिकारी म्हणाले, ''कर्मचाऱ्यांना कागदावर जरी ऐच्छिक सेवानिवृत्ती दिसत आहे. परंतु प्रत्यक्षात तसे होईल की नाही हे सांगता येत नाही. या संदर्भात कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. परंतु, समोर येऊन कोणी बोलण्याचे धाडस दाखवित नाही. 

यासंदर्भात पिंपरी चिंचवड येथील थरमॅक्स क्स कंपनीच्या कर्मचारी संघटनाशी संवाद साधला असता त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. 
 

Web Title: 'VRS' introduced by Thermax Company; Confusion among employees due to company Circuler letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.