शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

राष्ट्रीय भावना मनात जागवा; हक्क मतदानाचा शंभर टक्के बजवा : भारुडातून मतदानाचा जागर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 3:40 PM

संगीतबद्ध केलेल्या या भारुडावर नृत्याद्वारे मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत असून त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देमतदान जनजागृतीसाठी सरसावले लोककलावंतलोकरंजनातून प्रबोधन : सोशल मीडियावरुन करणार आवाहन व्यसनाधिनता, शिक्षणातील गळती, आरोग्य, स्वच्छता, अंधश्रद्धा, पाणी बचत आदी विषयांवरही पथनाट्य

पुणे : एकीकडे देशातील मुख्य प्रवाहातील कलाकार कॉंग्रेस आणि भाजपाला मतदान करा असे सांगत आमनेसामने उभे ठाकल्याचे चित्र असून दुसरीकडे लोककलाकार मात्र विचारस्वातंत्र्य अबाधित ठेवत मतदान करा असे आवाहन करु लागले आहेत. अशाच लोककलाकारांनी एकत्र येत ‘हक्क मतदानाचा १०० टक्के बजावा’ हे भारुड तयार केले आहे. संगीतबद्ध केलेल्या या भारुडावर नृत्याद्वारे मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत असून त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे.पिंपरी-चिंचवड येथील लोकप्रबोधिनी कला मंचाच्यावतीने या व्हिडीओची निर्मिती करण्यात आली आहे. या कला मंचाने लोकसंस्कृतीचे जतन करतानाच लोकरंजनातून प्रबोधनाचे काम केले आहे. देशाच्या जडणघडणीमध्ये तसेच स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या ज्ञात-अज्ञात, क्रांतीकारक, समाजसुधारक आदी महापुरुषांचे जीवन पोवाडे, गीतांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम केले जाते. यासोबतच व्यसनाधिनता, शिक्षणातील गळती, आरोग्य, स्वच्छता, अंधश्रद्धा, पाणी बचत आदी विषयांवरही पथनाट्य आणि कलेच्या माध्यमातून जनजागृती केली अहे. कला मंचाने नुकतेच  ‘हक्क मतदानाचा १०० टक्के बजावा’ हे भारुड तयार केले आहे. मतदानाकडे पाठ फिरवायची आणि नंतर चुकीची माणसे निवडली जातात म्हणून ओरड करायची या मानसिकतेवर बोट ठेवत जागरुकतेने मतदान केल्यास भविष्यकालीन नुकसान टाळण्याचे आवाहन या भारुडाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. हे भारुड लोक कलावंत आसराम कसबे यांनी लिहिले आहे. तर संगीत शाहीर बापू पवार यांनी दिले असून त्यांनीच गायले आहे. सागर मुव्हीज या संस्थेने छायांकनाची जबाबदारी उचलली होती. तर लहुमुद्रा फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल सौंदाडे यांनी विशेष सहकार्य दिलेल्या या उपक्रमात गणेश कांबळे, सुनिल क्षीरसागर, अंकुश पवार आणि विकी देवकुळे हे कलाकार सहभागी झाले आहेत. 

====मत हे दान करण्यासाठी असून विक्री करण्यासाठी नाही. आजही लोककला थेट मनाला भिडते. त्यामुळे याच कलेच्या माध्यमातून मतदानाविषयी जागरुकता आणण्याचा प्रयत्न आहे. सर्वांनी अधिकाधिक मतदान करुन लोकशाही बळकट करण्यासाठी हातभार लावावा याकरिता या भारुड व्हिडीओची निर्मिती करण्यात आली आहे. सोशल मिडीयावर हा व्हिडीओ अपलोड करुन त्याच्याद्वारे मतदानाचा संदेश दिला जाणार आहे. - आसराम कसबे, लोककलावंत

टॅग्स :PuneपुणेVotingमतदानLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक