मतदान हेच प्रगतीचे पुढचे पाऊल
By Admin | Updated: January 26, 2017 01:00 IST2017-01-26T01:00:06+5:302017-01-26T01:00:06+5:30
मतदान हाच विश्वास... मतदान म्हणजे विकासपर्व... मतदान म्हणजे सार्वभौमत्व... मतदान म्हणजे लोकशाही आणि मतदान हेच प्रगतीचे पुढचे पाऊल

मतदान हेच प्रगतीचे पुढचे पाऊल
पुणे : मतदान हाच विश्वास... मतदान म्हणजे विकासपर्व... मतदान म्हणजे सार्वभौमत्व... मतदान म्हणजे लोकशाही आणि मतदान हेच प्रगतीचे पुढचे पाऊल अशा घोषणांनी स. प. महाविद्यालय चौकातील परिसर बुधवारी दणाणून गेला.
एनसीसीच्या विद्यार्थिनींनी गणवेशामध्ये पुणेकरांसमोर येऊन फलकांद्वारे मतदान जनजागृती अभियान राबवून नव्या विकासपर्वाला गवसणी घालण्याकरिता पुढे या, असे आवाहन केले.
निनाद, पुणे व रेणुका स्वरूप मेमोरिअल गर्ल्स हायस्कूलतर्फे टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालय चौकात मतदार जनजागृतीचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका जयश्री शिंदे, तारा क्षीरसागर, रामदास शिंदे, चंद्रकांत भिकरे, सुनीता जोशी, सुनीता सोनावणे, यशोदिनी कुलकर्णी, प्रवीण दौंडकर, निनाद संस्थेचे रामलिंग शिवणगे, मयूरेश जोशी, अप्पा जोगळेकर, चेतन राऊत, भारत भूमकर, सतीश गांधी, अनूप जोशी यांच्यासह नागरिक उपस्थित होते. प्रशालेतील तन्मयी शितोळे या विद्यार्थिनीने अभियानाचे नेतृत्व केले.
निनाद संस्थेचे मयूरेश जोशी म्हणाले, ‘‘शालेय जीवनात लोकशाही आणि मतदानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, याकरिता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून लोकशाही बळकट करण्याकरिता मतदान करा, असे आवाहन करणाऱ्या या अभियानात विद्यार्थिनींसह निनाद अभ्यासिकेतील तरु णांनी सहभाग घेतला.