मतदारांनी अमिषाला बळी पडू नका, धाक दपटशा दाखल्यास कारवाई होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:27 IST2021-01-13T04:27:26+5:302021-01-13T04:27:26+5:30

-- नीरा : नीरा- शिवतक्रार मध्ये विविध ठिकाणी लागले फ्लेक्स, स्टिकर, झेंडे हे उद्या काढून घेण्यात येतील. मतदारांनी निरभय ...

Voters should not fall prey to Amisha, action will be taken if they show fear | मतदारांनी अमिषाला बळी पडू नका, धाक दपटशा दाखल्यास कारवाई होणार

मतदारांनी अमिषाला बळी पडू नका, धाक दपटशा दाखल्यास कारवाई होणार

--

नीरा :

नीरा- शिवतक्रार मध्ये विविध ठिकाणी लागले फ्लेक्स, स्टिकर, झेंडे हे उद्या काढून घेण्यात येतील. मतदारांनी निरभय वातावरणात मतदान करा, कोणाच्या ही अमिषाला बळी पडू नका, धाक दपटशा जर काही दाखवला जात असेल तर तातकाळ स्थानिक पोलिसांशी संपर्क करा, आपली दखल घेऊन समोर कोणी असले तरी त्यावर कारवाई केली जाईल. असा इशारा जेजूरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सुनील महाडिक यांनी दिला.

पुणे जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर उमेदवार असलेल्या व ८ हजार ६२० मतदारसंख्या असलेल्या नीरा - शिवतक्रार ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांनी निर्भयपणे मतदान प्रक्रियेत सहभागी होता यावे तसेच अवैध काम करणाऱ्यांनवर वचक बसव य हेतूने नीरा शहरातील प्रमुख मार्गावर जेजुरी पोलीसांनी पथसंचलन केले. यावेळी पोलीस निरिक्षक महाडिक बोलत होते. नीरा शिवतक्रार ग्रामपंचायत कार्यालया समोरील छ. शिवाजी महाराज चौकातून पोलीस पथसंचलनाला सायंकाळी साडेचार वाजता सुरवात झाली. पालखी मार्गावरुन, एस्टी बस स्थानक, पोलीस चौकी, बाजारतळ, माऊली पालखी विसावा, नगर रोड, बुवासाहेब कँर्नर, बारामती रोड, अहिल्याबाई होळर चौक याठिकाणाहून शिस्तबद्द पद्धतीने पथसंचलन करण्यात आले.

पोलीस निरिक्षक सुनील महाडिक, उपनिरीक्षक कैलास गोतपागर, नंदकुमार सोनवलकर, सुरेश गायकवाड, सुदर्शन होळकर, राजेंद्र भापकर, एन. पी. पिंगळे यांनसह पन्नस पोलीस कर्मचारी व होमगार्ड आदींनी पथसंचलनात सहभाग घेतला होता.

पुणे जिल्ह्यात १४४ आदेशान्वये ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या प्रचारात पाच पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र जमायचे नाही. ३७/१ च्या आदेशामध्ये बुधवारी सायंकाळी साडेपाचनंतर निवडणूकीचा प्रचार संपणार आहे. त्यानंतर निवडणूकीचे चिन्ह असलेले फ्लेक्स, झेंडे, प्रचाराचे साहित्य, लाठी काठी, धारधार शस्त्र आदी साहित्य घेऊन कोणी मिळून येणार नाही. जर कोणी अशा प्रकारे कोणी मिळून आला तर कडक कारवाई केली जाईल.

-सुनील महाडिक, पोलिस निरिक्षक

-

Web Title: Voters should not fall prey to Amisha, action will be taken if they show fear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.