शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पुण्यातील मतदार गावाकडे ओढले, उमेदवारांकडून लक्झरी गाड्यांचे बुकिंग 

By अजित घस्ते | Updated: November 19, 2024 11:52 IST

पुणे : शहर व जिल्ह्यात नोकरी, व्यवसाय कामानिमित्त अनेक बाहेरगावचे नागरिक राहतात. त्यात राज्यात एकाचवेळी २८८ मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया ...

पुणे : शहर व जिल्ह्यात नोकरी, व्यवसाय कामानिमित्त अनेक बाहेरगावचे नागरिक राहतात. त्यात राज्यात एकाचवेळी २८८ मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या गावी जाऊन मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिक जात आहेत. पक्षाकडूनही मतदार यादीत नावे पाहून नातेवाईकांकडून मोबाईल नंबर घेऊन उमेदवार शहरातील नागरिकांना गावाकडे ओढत आहेत. याचा परिणाम पुणे शहरातील मतदानाच्या टक्केवारीवर होऊ शकतो.

पुणे शहरालगतच्या तालुक्यांमधील मतदारसंघांमध्ये मतदार खेचण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. निवडणूक आणि जिल्हा प्रशासनाकडून गेल्या दीड-दोन महिन्यांपासून पुण्यामध्ये शहरी मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र पुण्यातील मतदार मूळ गावाकडे निघाले आहेत. किंबहुना, अनेकांना गावाकडे बोलावून तेथेच ठेवण्यात आले आहे. दुबार नोंदणी असलेल्या मतदारांच्या या भूमिकेमुळे पुण्यातील मतदानाचा टक्का वाढवणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.

पुणे शहर आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षण संस्था, उद्योग, व्यवसाय निमित्ताने लोक राहत आहेत. यामध्ये मराठवाडा आणि खान्देश भागातून मोठ्या प्रमाणात लोक पुण्यात आले आहेत. महापालिका निवडणुकांच्या काळात या मतदारांची नोंदणी पुण्यातील मतदार यादीत करण्यात आली होती. मात्र त्यांची गावाकडील मतदार यादीतील नावे कायम आहेत. यावेळी विधानसभा निवडणूक राज्यभर एकाच दिवशी होत असल्यामुळे अनेक उमेदवारांनी पुण्यात राहणाऱ्या, परंतु गावाकडील मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांसाठी वाहनांची विशेष व्यवस्था केली आहे.

शेकडो लक्झरी गाड्या तसेच इतर वाहने बुक करण्यात आली असून, जे मतदार स्वतःच्या वाहनातून मतदानासाठी जातील, त्यांचा गाडी खर्च आणि जेवणाचा खर्च उमेदवारांनी उचलला आहे.

मतदानाला जाणाऱ्या नागरिकांचा कल वाढला पुण्यातून सांगली, सातारा आणि कोल्हापूर पट्ट्यात सुमारे ७० ते ८० हजार मतदार जाण्याची शक्यता आहे. मराठवाडा, खान्देशातील नंदुरबार, धुळे आणि नाशिक, नगर या जिल्ह्यांमध्येदेखील मतदार गावाकडे निघाले आहेत. याशिवाय शहरालगतच्या मुळशी, भोर, वेल्हे, शिरूर, पुरंदर, खेड, आंबेगाव या मतदारसंघांतही पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील मतदार गावाकडे मतदानाला पसंती देत आहेत. 

टॅग्स :Puneपुणेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४VotingमतदानElectionनिवडणूक 2024