राजगुरुनगर: राजगुरुनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीत मतदानासाठी मतदारांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. सकाळपासून मतदानाला मोठा उत्साह होता. दुपारी दोन वाजेपर्यत ४० टक्के मतदान झाले. उमेदवारांचे प्रतिनिधी पक्षाचे नेते कार्यकर्ते यांनी गर्दी केली होती. पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महात्मा गांधी विद्यालयात सर्वाधिक मतदानकेंद्र असल्याने मतदान केंद्राबाहेर मोठी गर्दी झाली होती. शहरातील प्रत्येक केंद्रावरती गर्दी करत आहे. राजगुरुनगर नगरपरिषदे साठी सकाळी साडेअकरा वाजता १७.२४ टक्के मतदान झाले आहे. एकुण २५८०१ पैकी ४४४९ मध्ये १७९२ महिला २६५७ पुरुष मतदारांनी मतदान केले. दुपारी दीड वाजेपर्यंत ३७.८८ टक्के मतदान झाले आहे. २५८०१ पैकी एकुण ९७७३ मतदान झाले असून त्यात ४६१९ महिला आणि ५१५४ पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
राज्यातील २६४ नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज, मंगळवारी मतदान होत असून, त्यासाठी संपूर्ण मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे. सकाळी ७:३० वाजता मतदानास सुरुवात होईल आणि सांयकाळी ५:३० पर्यंत मतदानाची वेळ असेल. या निवडणुकीचा निकाल उद्या लागणार होता. मात्र राज्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी एकत्र जाहीर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेश दिला आहे. २० डिसेंबरच्या निवडणुकीपर्यंत आचारसंहिता लागू राहील आणि कोणालाही एक्झिट पोल प्रसिद्ध करता येणार नसल्याचे असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
Web Summary : Rajgurunagar witnessed enthusiastic voter turnout for the Nagar Parishad elections, reaching 40% by 2 PM. Polling stations saw large crowds and tight security. The state's municipal election results will be announced on December 21st, per court order.
Web Summary : राजगुरुनगर नगर परिषद चुनावों में मतदाताओं में उत्साह देखा गया, दोपहर 2 बजे तक 40% मतदान हुआ। मतदान केंद्रों पर भारी भीड़ और कड़ी सुरक्षा रही। अदालत के आदेशानुसार, राज्य के नगरपालिका चुनाव परिणाम 21 दिसंबर को घोषित किए जाएंगे।