लालमहाल परिसरात मतदार जागृती अभियान

By Admin | Updated: January 14, 2017 03:50 IST2017-01-14T03:50:11+5:302017-01-14T03:50:11+5:30

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने मतदार जागृती अभियान सप्ताहाचे

Voters awareness campaign in Lal Mahal area | लालमहाल परिसरात मतदार जागृती अभियान

लालमहाल परिसरात मतदार जागृती अभियान

पुणे : राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने मतदार जागृती अभियान सप्ताहाचे उद्घाटन विष्णू गरुड यांच्या हस्ते नागरिकांना पत्रके वाटून करण्यात आले.
या वेळी राज्याध्यक्ष गणेश राऊत, अरुण माने, दीपक परदेशी हे उपस्थित होते. मतदार जागृतीचा अभिनव उपक्रम विश्वकर्मा प्रतिष्ठानने राबविला असल्याचे गणेश राऊत यांनी सांगितले.
ज्या उमेदवाराला जाब विचारता येईल अशा उमेदवारालाच मतदान करा, निवडणुकीत उभे राहण्यास करोडो रुपये लागतात हे राज्यघटनेत नमूद नाही, अशा विविध १२ प्रकारच्या प्रबोधनपर शब्दरचना या पत्रकात आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Voters awareness campaign in Lal Mahal area