शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठलने मन मोठे करून दिला पेपर

By admin | Updated: February 28, 2015 23:20 IST

हॉर्टिकल्चरमध्ये शिकणाऱ्या एका होतकरू विद्यार्थ्याने वडिलांच्या अपघाती निधनाने खचून न जाता त्यांच्या मृतदेहाला मुखाग्नी देऊन बारावीची परीक्षा दिली.

रांजणगाव गणपती : निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील विद्या विकास मंदिर व्यवसाय अभ्यासक्रमातील इ. १२ वी हॉर्टिकल्चरमध्ये शिकणाऱ्या एका होतकरू विद्यार्थ्याने वडिलांच्या अपघाती निधनाने खचून न जाता त्यांच्या मृतदेहाला मुखाग्नी देऊन बारावीची परीक्षा दिली. त्याच्या शिकण्याच्या जिद्दीला सलाम करून त्याने इतर विद्यार्थ्यांपुढे एक नवा आदर्श घालून दिला आहे. शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी व ग्रामीण भागातील शाळेत शिकत असलेल्या विठ्ठल सोमनाथ येळे (रा. पारोडी, ता. शिरूर) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो घरापासून ६ कि.मी.अंतरावर असलेल्या निमगाव म्हाळुंगी येथे इ.१२ वी हॉर्टिकल्चरमध्ये शिक्षण घेत आहे. त्याचे वडील सोमनाथ किसन येळे यांना दोन दिवसांपूर्वी अपघात झाल्याने त्यांना उपचारासाठी पुणे येथे दाखल करण्यात आले होते. त्या अपघाताचे मनावर दडपण असतानाही विठ्ठल मोठ्या आत्मविश्वासाने त्या काळातील परीक्षेला सामोरे गेला. मात्र, दि.२८ रोजी पहाटेच्या सुमारास अभ्यास करताना त्याला वडिलांच्या निधनाची दु:खद बातमी कानावर आली. त्याच दिवशी हॉटिकल्चरचा पेपर असल्याने ती परीक्षा कशी द्यायची, असा यक्ष प्रश्न त्याच्या पुढे पडला. त्यानुसार विठ्ठलने सकाळी १० वाजता वडिलांच्या देहाला मुखाग्नी देऊन वडिलांच्या मृत्यूमुळे झालेले दु:ख बाजूला ठेवून बोर्डाच्या वेळापत्रकानुसार वेळेवर परीक्षेला हजर झाला व मोठ्या जिद्दीने बोर्डाची १२ वीची परीक्षा दिली. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी वाघोली परिसरात अशीच घटना घडली होती. (वार्ताहर)४त्याच्या वर्गमित्राच्या माध्यमातून त्याला शिकविणाऱ्या प्रा.संजय देशमुख व प्रमोद उगले, तसेच तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील आर. बी. गुजर प्रशालेच्या इ.१२ वी परीक्षा केंद्र संचालक रत्नप्रभा देशमुख यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली. त्यास धीर देत त्याचे मनोबल वाढविले व आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाण्याचे सुचविले.