विश्रांतवाडीत मद्यपींचा धिंगाणा सुरूच

By Admin | Updated: May 19, 2014 01:12 IST2014-05-19T01:12:18+5:302014-05-19T01:12:18+5:30

विश्रांतवाडी परिसरामध्ये अनेक ठिकाणी अवैध धंदे सुरू असून, मोठ्या प्रमाणावर अनेक अनधिकृत हॉटेलमधून दारूविक्री सुरू असते.

In the Vistranvadi, the wine drunk | विश्रांतवाडीत मद्यपींचा धिंगाणा सुरूच

विश्रांतवाडीत मद्यपींचा धिंगाणा सुरूच

विश्रांतवाडी : विश्रांतवाडी परिसरामध्ये अनेक ठिकाणी अवैध धंदे सुरू असून, मोठ्या प्रमाणावर अनेक अनधिकृत हॉटेलमधून दारूविक्री सुरू असते. या हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतरही रस्त्यावरच दारू पिणार्‍यांचा गोंधळ सुरू असतो. याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, या प्रकारांकडे पोलीस डोळेझाक करीत असून, यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विश्रांतवाडी, धानोरी, दिघी, टिंंगरेनगर परिसराचा दिवसेंदिवस विकास होत आहे. साहजिकच या भागात राहणार्‍या नागरिकांच्या गरजाही त्याप्रमाणे आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी घराबाहेर पडून रात्री उशिरापर्यंत हॉटेलमध्ये बसणारा वर्गही मोठ्या प्रमाणात या भागात वास्तव्यास आहे. याबरोबरच जवळच असणार्‍या विमाननगर, कल्याणीनगर, येरवडा आदी भागांतील आयटी कंपन्यांमधील कर्मचार्‍यांचेही या परिसरात वास्तव्य आहे. या सर्व वर्गांत मोडणार्‍या नागरिकांना शनिवारी व रविवारी सुट्टी असते. त्यामुळे शुक्रवार व शनिवारी रात्रीच्या वेळी उशिरापर्यंत अनेक हॉटेलांमध्ये धिंगाणा सुरू असतो. या लोकांमध्ये बर्‍याचदा रस्त्यावरच भांडणे सुरू असल्याचेही दिसते. (वार्ताहर)

Web Title: In the Vistranvadi, the wine drunk