शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
6
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
7
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
8
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
9
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
10
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
11
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
12
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
13
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
15
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
16
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
17
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
18
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
19
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
20
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

दा-याघाटास लवकरच चालना देणार - विनोद तावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 7:21 AM

जुन्नर तालुका पर्यटनक्षेत्र म्हणून लवकरच घोषित करण्यात येईल, त्याचप्रमाणे दाºयाघाटास चालना देण्यात येईल, असे मत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जुन्नर येथे व्यक्त केले.

आपटाळे : जुन्नर तालुका पर्यटनक्षेत्र म्हणून लवकरच घोषित करण्यात येईल, त्याचप्रमाणे दाºयाघाटास चालना देण्यात येईल, असे मत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जुन्नर येथे व्यक्त केले.किल्ले शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित केलेल्या शिवप्रेमीच्या मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी राज्याचे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, मुंबईचे भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे व पुणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.यावेळी जुन्नर तालुक्यातील १३ जणांना ‘शिवनेरभूषण पुरस्कार’ शालेय शिक्षणमंत्री व अन्य मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन हे सरकार सत्तेत आले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक किल्ल्यांची डागडुजी करण्यात येत आहे, त्याकरिता १२८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सिंहगड किल्ल्याप्रमाणे शिवनेरीवरही दृकश्राव्य माध्यमातून माहिती दिली जाईल. यावर्षापासून जुन्नरला शिवनेरी महोत्सव सुरु केला आहे. सांस्कृतिक विभागाने याबाबतीत छान काम केले.शिक्षण विभागात जुन्नर तालुक्याचे काम चांगले आहे. राज्यात इंग्रजी माध्यमातून मराठी माध्यमात २५ हजार विद्यार्थी आले. यांचे श्रेय जिल्हा परिषद शिक्षकांना जाते. मातृभाषेतून शिक्षण घेतले पाहिजे. मराठी भाषा डोळे आहे, तर इंग्रजी भाषा चष्मा आहे.जर डोळेच नसतील तर चष्म्याचा काय उपयोग? असे ही यावेळी तावडे म्हणाले .ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, गोपीनाथराव मुंडे यांनी संघर्ष यात्रा जुन्नरमधून काढली. त्यामुळे शिवशाही आली होती. आम्ही छत्रपती शिवाजीमहाराजांच्या विचाराने काम करत आहोत. त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडविणारच.यावेळी समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पर्यटन मंत्री जयकुमार रावळ यांनी जुन्नर तालुका पर्यटन तालुका घोषित करण्याची जबाबदारी पंकजाताई मुंडे यांच्यावर टाकली आहे.खासदार शिवाजीराव आढळराव यांनी याभागातील प्रश्नांना चालना देण्याची मागणी केली. जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांनी पर्यटनास चालना व दाºयाघाटाचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली .त्याचप्रमाणे शिवनेर महोत्सव सुरू केल्याबद्दल शासनास धन्यवाद दिले.२0१६-१७- भरत अवचट, राजश्री बोरकर, सुंदरताई कुºहाडे, तात्यासाहेब गुंजाळ, विष्णुपंत महाराज ढमाले, गणेश वाळुंज, मुरलीधर काळे, जे. एल. वाबळे, प्रमोद महाबरे (मरणोत्तर)२0१७-१८ बाजीराव दांगट, प्रकाश खांडगे, रमेश खरमाळे, दत्ता म्हसकर, अनिलतात्या मेहेर, माऊली वाबळे, केरुशेठ वेठेकर, महादेव वाघ, वैभव गायकवाड, (मरणोत्तर पुरस्कार निवृत्तीशेठ शेरकर, शिवाजीराव काळे, विलास तांबे )

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडे