शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गौतमी पाटीलच्या आदाकारीला ग्रामस्थांची दाद ; पुण्यातील मोहितेवाडीत शो गोंधळाविना पडला पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 16:22 IST

गौतमी पाटीलच्या आदाकारीला दाद देत तरुणाईसह महिला, तरुणी, चिमुकली मुलं यांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमात हजेरी लावली

भानुदास पऱ्हाड 

शेलपिंपळगाव : मागील काही दिवसांपासून गौतमी पाटील हे नाव चांगलंच चर्चेत आलं आहे. गौतमीचा डान्स पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी होते. मात्र तिच्या बहुतांश कार्यक्रमात चाहत्यांचा गोंधळ, वाद होत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र शेलपिंपळगाव हद्दीतील मोहितेवाडी गावच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेला 'गौतमी पाटील शो' गोंधळाविना पार पडला. परिणामी मोहितेवाडीतील ग्रामस्थांनी इतरांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.           ग्रामीण भागात यात्रा सुरू झाल्या आहेत. अनेक गावातील यात्रा - जत्रांमध्ये सांस्कृतिक नाच - गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला जातो. विशेषतः लोकनाट्य तमाशा, भारुड, आर्केस्ट्रा आयोजित करण्यावर भर आहे. मात्र सद्यस्थितीत गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाला फार मोठी पसंती दिली जात आहे. गावची यात्रा म्हटलं की, गावात गौतमीला आणायचंचं असा सूर ग्रामस्थांमधून ऐकायला मिळत आहे. दरम्यान गौतमीला फॉलो करणाऱ्यांची आणि तिच्या कार्यक्रमांना गर्दी करण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गौतमीची लावणी अश्लील असल्याचा आरोप करत तिला यापूर्वी प्रचंड ट्रोल करण्यात आलं आहे. त्यामुळे तिच्या कार्यक्रमाला मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागत आहे.

दरम्यान मोहितेवाडीतील कार्यक्रमात तरुणांसह गावातल्या तरुणींनी देखील ठेका धरला. विशेष म्हणजे तिच्या या कार्यक्रमात कोणताही गोंधळ झाला नाही.  गौतमी पाटीलच्या आदाकारीला दाद देत तरुणाईसह महिला, तरुणी, चिमुकली मुलं यांनी मोठ्या संख्येने गौतमीच्या कार्यक्रमात हजेरी लावली.

टॅग्स :PuneपुणेartकलाSocialसामाजिकdanceनृत्यMONEYपैसाSocial Viralसोशल व्हायरल