सारोळा येथे युवकाकडून गावठी पिस्तूल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:14 IST2021-09-14T04:14:27+5:302021-09-14T04:14:27+5:30

याप्रकरणी वृषभ तानाजी बागल (वय २२, रा. मु. रानमळा कातर, खटाव, जि. सातारा) यास या पथकाने पुढील तपासासाठी राजगड ...

Village pistol seized from youth at Sarola | सारोळा येथे युवकाकडून गावठी पिस्तूल जप्त

सारोळा येथे युवकाकडून गावठी पिस्तूल जप्त

याप्रकरणी वृषभ तानाजी बागल (वय २२, रा. मु. रानमळा कातर, खटाव, जि. सातारा) यास या पथकाने पुढील तपासासाठी राजगड पोलिसांना ताब्यात दिले आहे. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल, एक जिवंत काडतूस, एक मोबाईल व एक सिल्व्हर रंगाची इनोव्हा गाडी असा एकूण ४ लाख ४१ हजार १०० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे.

राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत फरार आरोपीचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सारोळा येथील महामार्गाच्या पुलाखाली एक सिल्व्हर रंगाची इनोव्हा गाडीतील व्यक्तीची चौकशी केली असता गाडीच्या डिकीमध्ये विनापरवाना एक गावठी पिस्तूल सापडले आहे.

सोबत फोटो व ओळ : सारोळा (ता.भोर) येथे महामार्गाच्या पुलाखाली पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे कारवाई करून मुद्देमालासह आरोपीस ताब्यात घेतले.

130921\img-20210913-wa0019__01.jpg

???? ???? ? ?? : ?????? (??.???) ???? ????????????? ???????? ???? ??????? ??????? ?????? ?????? ???? ???????????? ?????? ??????? ?????.

Web Title: Village pistol seized from youth at Sarola