सराईत गुन्हेगाराकडून एक गावठी पिस्टल, जिवंत काडतूस हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:16 IST2020-12-05T04:16:48+5:302020-12-05T04:16:48+5:30
पुणे : बंडगार्डन आणि कोरगाव पार्क पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 12 गंभीर गंभीर गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात ...

सराईत गुन्हेगाराकडून एक गावठी पिस्टल, जिवंत काडतूस हस्तगत
पुणे : बंडगार्डन आणि कोरगाव पार्क पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 12 गंभीर गंभीर गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात सापडला. त्याच्याकडून एक गावठी पिस्टल आणि 2 जिवंत काडतूस असा 26 हजार रूपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला.
शगुन जोगदंड (25 वर्षे रा.13 ताडीवाला रस्ता, बालमित्र तरूण मंडळाजवळ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेक्कन पोलीस ठाण्याच्या हददीत सकाळी गस्त घालत असताना डी.बी पथकाचे कर्मचारी सचिन कदम यांना मुठा नदी पात्राच्या रस्त्यालगत स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्रामागे डेक्कन भागात एक व्यक्ती थांबल्याची माहिती मिळाली. त्याच्याकडे गावठी बनावटी पिस्टल व जिवंत काडतुसे आहेत. त्याच्यावर झडप घालून ताब्यात घेतले असता त्याच्याकडे गावठी बनावटी पिस्टल दिसले. त्यामध्ये दोन जिवंत काडतुसे सापडली. हा एक सराईत गुंड असून, त्याच्याविरूद्ध बंडगार्डन आणि कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, त्याने पिस्टल व काडतुसे कोणाकडून व कशाकरिता आणले आहे याचा तपास सुरू आहे. पश्चिम प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, परिमंडळ 1 पोलीस उपआयुक्त डॉ. प्रियांका नारनवरे, विश्रामबाग विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मालोजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डेक्कन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे राजू चव्हाण, डी.बी पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब झरेकर, पोलीस उपनिरीक्षक किशोर शिंदे, कर्मचारी सचिन कदम, बाळासाहेब भांगले, सचिन चव्हाण, श्रीकांत लोढे , ज्योतीराम मोरे, शेखर शिंदे यांनी तपास केला.
--------------------------------------------------------------------------