गाव तेथे क्रीडांगण आवश्यक : राजेंद्र गावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:06 IST2021-02-05T05:06:24+5:302021-02-05T05:06:24+5:30
शरदवाडी (ता. शिरूर) येथे जयमल्हार नवतरुण मंडळातर्फे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे ...

गाव तेथे क्रीडांगण आवश्यक : राजेंद्र गावडे
शरदवाडी (ता. शिरूर) येथे जयमल्हार नवतरुण मंडळातर्फे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे, भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य वासुदेव जोरी, माजी अध्यक्ष नाथा जोरी, माजी उपसरपंच गणेश सरोदे, माजी सरपंच बाळासाहेब फिरोदिया, रामकृष्ण सरोदे, पुणे शहर पोलीस राम मेरगळ, गणेश जोरी, अशोक गांजे, संदीप सरोदे, सुभाष सरोदे, चेअरमन जनार्धन सरोदे, डॉ. पप्पू गांजे, विठ्ठल जोरी, बाळासाहेब जोरी, मारुती जोरी, प्रशांत जोरी, पोपट सरोदे, दशरथ जोरी, बाबाजी जोरी, भाऊसाहेब जोरी यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पारगाव, द्वितीय क्रमांक पिंपरी, तृतीय क्रमांक चोंभूत तर चतुर्थ क्रमांक फाकटे संघाने मिळविला.