शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime : हिंगणीगाड्यात ३ लाखांचा गावठी दारू साठा उद्ध्वस्त  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 12:01 IST

हिंगणीगाडा (ता. दौंड, जि. पुणे ) येथे निवडणुकीच्या तोंडावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत 2,96,000 रुपये किमतीचा ...

हिंगणीगाडा (ता. दौंड, जि. पुणे) येथे निवडणुकीच्या तोंडावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत 2,96,000 रुपये किमतीचा गावठी दारू साठा उद्ध्वस्त केला.ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त विजय सूर्यवंशी, संचालक (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे यांच्या आदेशानुसार पुणे विभागाचे विभागीय उप-आयुक्त सागर धोमकर, अधीक्षक चरणसिंग बी. राजपूत, उपअधीक्षक उत्तमराव शिंदे, सुजित पाटील आणि संतोष जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, दौंड विभाग, पुणे यांच्या पथकाने आज (दि. 18/11/2024) यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे हिंगणीगाडा येथे छापा टाकून केली.गुप्त माहितीच्या आधारे या ठिकाणी अवैध गावठी दारूचा साठा आढळून आला. आरोपी पारसमणी पोपी राठोड (वय 34) हिच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा, 1949 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, सदर दारूचा पुरवठादार जेजुरी येथील संतोष राठोड फरार झाला आहे.कारवाईदरम्यान, गावठी हातभट्टी दारूने भरलेले 35 लिटर क्षमतेचे एकूण 80 कॅन पंचांसमक्ष मोकळ्या जागेत ओतून नष्ट करण्यात आले. त्यानंतर रिकामे कॅनही उद्ध्वस्त करण्यात आले. एकूण 2,96,000 रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला असल्याची माहिती निरीक्षक विजय रोकडे यांनी दिली.गावठी दारू निर्मूलनाची धडक मोहीमराज्य उत्पादन शुल्क विभागाने निवडणूक काळातील अवैध दारूविक्री रोखण्यासाठी सुरु केलेल्या मोहिमेत ही मोठी कारवाई मानली जात आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसArrestअटक