घोटवडेत एक गाव एक शिवजयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:12 IST2021-04-01T04:12:21+5:302021-04-01T04:12:21+5:30

यावेली गावातील मुख्य चौकातील अश्वारूढ शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन पौड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विनायक देवकर यांच्या हस्ते झाले. ...

A village in Ghotwade is a Shiva Jayanti | घोटवडेत एक गाव एक शिवजयंती

घोटवडेत एक गाव एक शिवजयंती

यावेली गावातील मुख्य चौकातील अश्वारूढ शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन पौड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विनायक देवकर यांच्या हस्ते झाले. रोकडेश्वर सभागृहामध्ये शिवस्वप्न साकार प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान कार्यक्रम झाला. रक्त संकलन करण्यासासाठी भारती विध्यापिठाच्या, भारती हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणेच्या टीमने रक्त संकलन केले. त्यामध्ये साधारण ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले याकामी भारती हॉस्पिटलच्या डॉ. पटेल, टेक्निशियन सुवर्णा सूर्यवंशी, दिनेश काकडे, संध्या जाधव, शैला कांबळे, विशाल ढोबे, राहुल कुटेकर यांनी सहकार्य केले. यावेळी शिवस्वप्न साकार प्रतिष्ठाणचे किरण शेळके, समीर भेगडे, रविराज बालवडकर, ओम बालवडकर, हर्षल शेळके, संतोष गोडाबे, प्रकाश खाणेकर, गणेश खाणेकर, रोहन भेगडे, अक्षय खाणेकर, सागर भेगडे, अमर भेगडे आदींनी रक्तदान केले.

Web Title: A village in Ghotwade is a Shiva Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.