आलेगाव पागा येथे गावठी दारुची भट्टी पोलिसांकडून उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:10 IST2021-04-22T04:10:24+5:302021-04-22T04:10:24+5:30

यासंदर्भात देताना माहिती सहायक पोलीस निरीक्षक सुनील मोटे यांनी सांगितले की,आलेगाव पागा गावच्या हद्दीतील कुरणात अविनाश पोपट ...

A village distillery at Alegaon Paga was demolished by the police | आलेगाव पागा येथे गावठी दारुची भट्टी पोलिसांकडून उद्ध्वस्त

आलेगाव पागा येथे गावठी दारुची भट्टी पोलिसांकडून उद्ध्वस्त

यासंदर्भात देताना माहिती सहायक पोलीस निरीक्षक सुनील मोटे यांनी सांगितले की,आलेगाव पागा गावच्या हद्दीतील कुरणात अविनाश पोपट पवार यांची गावठी हातभट्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक सुनील मोटे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने तेथे छापा टाकला असता अंदाजे सदोतीस हजार रुपयांचा मुद्देमाल मिळाला. आरोपी अविनाश पवार याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील मोटे करीत आहेत. तालुक्यात मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टी व्यवसाय सुरू असून त्यांच्यावर धडक कारवाई होण्यांची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

--

फोटो क्रमांक : २१ न्हावरे भट्टी उद्वस्त

फोटो आहे .

फोटोओळी : आलेगाव पागा (ता.शिरूर ) येथे गावठी दारुची भट्टी उदवस्थ करताना पोलिस कर्मचारी .

Web Title: A village distillery at Alegaon Paga was demolished by the police