जिल्हा परिषद निधीतून गावचा विकास : गोकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:09 IST2021-08-01T04:09:40+5:302021-08-01T04:09:40+5:30

चिंचोशी (ता. खेड) येथे गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन सरपंच उज्ज्वला गोकुळे व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ...

Village development from Zilla Parishad fund: Gokule | जिल्हा परिषद निधीतून गावचा विकास : गोकुळे

जिल्हा परिषद निधीतून गावचा विकास : गोकुळे

चिंचोशी (ता. खेड) येथे गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन सरपंच उज्ज्वला गोकुळे व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. याप्रसंगी उपसरपंच माया निकम, ग्रामपंचायत सदस्य सीमा गोकुळे, मंगल शिंदे, कविता गोकुळे, सचिन भोसकर, सुनील जाधव, अमोल कानडे, सुभाष मोरे, सतीश निकम, शहाजी निकम, बाबाराजे दौंडकर, संजय गोकुळे, माजी सरपंच सर्जेराव भोसकर, सुनील बायखोर, बापूसाहेब गोकुळे, युवराज भोसकर, दिलीप गोकुळे, इंद्रभान दरगुडे, सुरेश गोकुळे, कैलास भोसकर, लहू गोकुळे, ग्रामसेविका सारिका गोरडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या फंडातून गावातील शिंदे आळी येथील रस्ता, जिल्हा परिषद शाळा ते दौंड आळी रस्ता, स्मशानभूमी रस्ता व बायखोर, गोकुळेवस्ती, भोसकरवस्ती रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबाराजे दौंडकर तर, आभार ग्रामपंचायत सदस्य सचिन भोसकर यांनी मानले.

३१ शेलपिंपळगाव १

चिंचोशी (ता. खेड) येथे गावातील विविध रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करताना मान्यवर.

Web Title: Village development from Zilla Parishad fund: Gokule