शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

गाव तस चांगलं...... विकायला काढलं 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 19:51 IST

पुण्यापासून २० किमी अंतरावर असलेल पुरंदर तालुक्यातील बोपगाव हे गाव गावकऱ्यांनी चक्क विकायला काढलंय.

ठळक मुद्देग्रामपंचायत सदस्य व पदाधिकाऱ्यांनी सामुहिकरित्या राजीनामे देण्याचे इशारे देऊन ही काहीच फरक नाहीयेत्या दोन दिवसात तहसिल कार्यालयाचे पथक पाठवून वस्तुस्थितीची माहिती घेत कार्यवाही करणार

बाळासाहेब काळेजेजुरी: कर्जबाजारी किंवा परिस्थितीसमोर हार पत्करलेला माणूस जेव्हा हाताशी काही उरत नाही तेव्हा त्याच्या जवळच्या गोष्टी विक्रीला काढतो. परंतु, कधी तुम्हाला एखादे गावच विक्रीला काढल्याची बातमी वाचायला मिळाली तर आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.पूर्ण गावालाच अतिक्रमणांचा विळखा पडल्याने वैतागलेल्या तरुणांनी गावभर गाव विक्रीला काढल्याची प्रसिध्दीपत्रके चिकटवली. आणि आजूबाजूच्या परिसरात गाव विक्रीला काढल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. ही घटना आहे पुरंदर तालुक्यातील बोपगावची... आजपर्यंत सर्व काही वस्तू विकायला काढलेल्या आपण पाहिलं आहे, पण पुरंदर तालुक्यात अस एक गाव आहे. जिथल्या गावकऱ्यांनी चक्क गावच विकायला काढलंय. पुण्यापासून २० किमी अंतरावर असलेल पुरंदर तालुक्यातील बोपगाव हे गाव श्री क्षेत्र कानिफनाथ गड देवस्थान म्हणून महाराष्ट्राला परिचित आहे. पण हे गाव सध्या ग्रामस्थांनी मोफत विकायला काढलेले आहे. कारण सुद्धा तसेच आहे. या गावात १९ एकर ग्रामपंचायतीच्या गावठाणाची गायरान जमीन आहे. ग्रामपंचायतीने गायरानात ९ ते १० बेघर कुटुंबांना घरे बांधण्यासाठी पूर्वीच जागा देण्यात आलेली होती. त्याचबरोबर अडीच एकर जमीन ही ग्रामपंचायतीने महावितरणला विद्युत प्रकल्पासाठी दिली आहे. तेथे वीज उपकेंद्र उभारण्यात आलेले आहे. याशिवाय पाच एक्कर जागा श्री कानिफनाथ गड देवस्थानसाठी भाविकांच्या सोयी सुविधांसाठी देण्याचे ग्रामपंचायतीचे पूर्वीच नियोजन ही आहे. शिल्लक जागा ही भविष्यातील समाजपयोगी कामासाठी ग्रामपंचायतीने राखीव ठेवली होती. मात्र, गेल्या वर्षभरात राजकीय नेत्यांनी गायरानाच्या पुणे सासवड रस्त्यालगत या रिकाम्या जागेवर आपला मालकी हक्क दाखवून पत्र्याची पक्की शेड उभी करून आपला संसार थाटण्याचा उद्योग उभारला आहे. सासवड पुणे मार्गालगतच्या याच जागेत कानिफनाथ ट्रस्ट पंचकमिटीच्या नियोजित जागेचा बोर्ड होता. तो ही तोडून त्या ठिकाणी अनेकांनी रातोरात गाळे उभे करून व्यवसाय थाटले आहेत. त्यांना महावितरणकडून अनधिकृत वीज जोडही मिळत आहेत. आज या जागेवर राजरोसपणे अतिक्रमणे सुरू आहे. बोपगाव ग्रामपंचायतीकडून वारंवार सूचना हरकती आल्यावरदेखील ही पंचायतीला न जुमानता अतिक्रमणे वाढतच राहिली आहेत. यामुळे वैतागलेल्या ग्रामस्थांनी काही दिवसापूर्वी या मोकळ्या जागेवर सामूहिक आंदोलन केले होते. गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी महसूल विभागाकडे, ग्रामपंचायतीकडे पत्रे देऊन अतिक्रमणे हटवण्याची मागणीही केलेली आहे. ग्रामपंचायतीने ही वारंवार हरकती घेऊन अतिक्रमणे थांबत नसल्याने ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकाऱ्यांनी सामुहिकरित्या राजीनामे देण्याचे इशारे देऊन ही काहीच फरक पडला नाही.  प्रशासनाकडून ही बाब गांभीर्याने घेतली जात नाही. तोपर्यंत ही तक्रार कमी होण्यातली नाही. गावातील १९ एक्कराचे हे गायरान आहे. कानिफनाथ देवस्थानचे विश्वस्त दीपक फडतरे म्हणाले, हे समाज उपयोगी उपक्रमांसाठी राखीव ठेवणे गरजेचे आहे. मात्र प्रतिष्ठांनी या जागेवर अतिक्रमणे केलेली आहेत.

या संदर्भात गावातील तरुण सहकार्यांसह आम्ही ग्रामपंचायत, तहसिल कार्यालय, जिल्हाधिकारी  यांच्याकडे अतिक्रमणे हटवण्याची मागणी केलेली असल्याचे सांगितले. या संदर्भात पुरंदर दौंडचे विभागीय अधिकारी संजय आसवले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी येत्या दोन दिवसात या ठिकाणी तहसिल कार्यालयाचे पथक पाठवून वस्तुस्थितीची माहिती घेत योग्य ती कार्यवाही करणार असल्याचे म्हटले आहे. 

टॅग्स :Purandarपुरंदरcollectorतहसीलदारgram panchayatग्राम पंचायत