शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विजय शिवतारेंनी घेतला फायनल निर्णय: १२ तारखेला फॉर्म भरणार, निवडणुकीचं सर्व प्लॅनिंग सांगितलं! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 13:35 IST

Baramati Lok Sabha: 'मी १ एप्रिल रोजी माऊलींच्या पालखीतळावर पहिली जाहीर सभा घेणार आहे. या सभेला कमीत कमी ५०-६० हजार लोक उपस्थित राहणार आहेत,' असा दावा शिवतारे यांनी केला आहे.

Vijay Shivtare ( Marathi News ) : शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी आपण बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं निश्चित केलं असल्याचं सांगत आज थेट निवडणूक अर्ज भरण्याची तारीखही जाहीर केली आहे. "मी १२ एप्रिल रोजी १२ वाजता बारामती लोकसभा मतदारसंघातून माझा उमेदवारी अर्ज दाखल करून प्रस्थापितांचे १२ वाजवणार आहे," अशी घोषणा शिवतारे यांनी केली आहे. मतदारसंघात मला प्रचंड प्रतिसाद मिळत असून माझा विजय होणारच, असा विश्वासही विजय शिवतारे यांनी व्यक्त केला. पुरंदरमधील प्रमुख कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली आहे.

"पवार कुटुंबाने ग्रामीण भागात दहशतवाद निर्माण केला आहे. हा ग्रामीण दहशतवाद मोडून काढण्यासाठी मी ही निवडणूक लढवत आहेत. मी दोन्ही पवारांविषयी माझ्या सभांमध्ये बोलणार आहे. अजित पवारांनी अनेक लोकांना त्रास दिला आहे. सुप्रिया सुळेंनीही मागील १५ वर्षांत लोकांच्या हिताचं दोन टक्केही काम केलं नाही," असा हल्लाबोल विजय शिवतारेंनी केला आहे.

विजय शिवतारेंनी सांगितली निवडणूक रणनीती:

- १ एप्रिल रोजी माऊलींच्या पालखीतळावर पहिली जाहीर सभा घेणार आहे. या सभेला कमीत कमी ५०-६० हजार लोक उपस्थित राहणार.

- माझ्या व्यासपीठावर कोणताही मोठा नेता उपस्थित राहणार नाही. माझ्यासोबत फक्त जनसामान्य दिसतील.

- माझी ओळखपत्रं गावा-गावात वाटली जातील.

- १ एप्रिल रोजी सभा झाल्यानंतर पाच विधानसभा मतदारसंघांत सभा घेतल्या जातील. या सभांमध्ये त्या त्या भागातील प्रश्न मांडले जातील.

- १२ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार

- मला निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर ते लोकांपर्यंत पोहोचवले जाईल.

- ४ जूनला जनशक्ती काय असते, लोकांच्या भावना काय असतात ते सर्वांसमोर येईल. 

टॅग्स :Vijay Shivtareविजय शिवतारेbaramati-pcबारामतीAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४