शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र केसरी अधिवेशनसाठी दौंडमधील पिंपळाचीवाडी येथे जय्यत तयारी सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 18:31 IST

व्यासपीठाची बांधणी तसेच गादी व माती विभागातील कुस्त्यांसाठी मैदान तयार करण्याची जय्यत तयारी सुरू

भांडगाव : खोर (ता. दौंड) येथील पिंपळाचीवाडी येथे होणाऱ्या दौंड तालुका निवड चाचणी कुस्ती स्पर्धेच्या जय्यत तयारीला आता वेग आला आहे. मैदानाचे सपाटीकरण, व्यासपीठाची बांधणी तसेच गादी व माती विभागातील कुस्त्यांसाठी मैदान तयार करण्याची जय्यत तयारी सुरू आहे. गुरुवारी (दि. ९) ही स्पर्धा होणार आहे. सकाळी ९ ते ११ या वेळेत पैलवानांची वजने घेण्यात येणार आहेत. दुपारी १२ वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे. दौंड तालुक्यातील अनेक पैलवान या स्पर्धेमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती स्पर्धेचे मुख्य आयोजक व दौंड तालुका कुस्तीगीर तालीम संघाचे खजिनदार पैलवान सागर चौधरी यांनी दिली.खोर पिंपळाचीवाडीसारख्या ग्रामीण भागामध्ये होणारी ही तालुकास्तरीय स्पर्धा अत्यंत उत्कृष्ट आयोजनामध्ये होणार असून याचे उद्घाटन विद्यमान आमदार व तालीम संघाचे अध्यक्ष राहुल कुल यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेसाठी दौंड तालुक्यातील कोनाकोपऱ्यातून अनेक पैलवान मंडळी व वस्ताद मंडळी आवर्जून उपस्थित राहणार आहेत. यावर्षी प्रथमच दौंड तालुका मल्ल सम्राट किताब पैलवानांना बहाल करण्यात येणार आहे. प्रत्येक वजन गटातील विजेत्या पैलवानांना चषक, प्रमाणपत्र व पदक देखील देण्यात येणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा अत्यंत नियोजनबद्ध व तालुक्यातील कुस्तीशौकिनांना आकर्षण ठरणारी मानली जात आहे.ही स्पर्धा तालुक्यातील कुस्ती खेळाडूंना प्रोत्साहन आणि प्रेरणा देणारी असल्याचे मत स्पर्धा समिती अध्यक्ष ॲड. ज्ञानेश्वर चौधरी यांनी केले आहे. धर्मवीर संभाजीराजे तालीम संघ पिंपळाची वाडी व दौंड तालुका कुस्तीगीर तालीम संघ यांच्याकडून संपूर्ण व्यवस्थापन केले जाईल.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtra Kesariमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा