शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Pune Crime| इंदापुरात साडे अठ्ठावीस किलो गांजासह १८ लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 17:59 IST

इंदापूर ( पुणे ) : इंदापूर शहरातील बाह्यवळन महामार्ग, महात्मा फुले चौक येथे रस्त्यात अपघातग्रस्त कार जागेवरच सोडून चालक व ...

इंदापूर (पुणे) :इंदापूर शहरातील बाह्यवळन महामार्ग, महात्मा फुले चौक येथे रस्त्यात अपघातग्रस्त कार जागेवरच सोडून चालक व मालक फरार झाल्याने सदरची कार ताब्यात घेऊन तिची तपासणी केली. सदर कारच्या मागील डीक्कीमध्ये अवैध २८.५ किलो गांजा सापडल्याने खळबळ उडाली. इंदापूर पोलिसांनी कार व गांजा पंचासमक्ष जप्त करून अज्ञात कारचालक व मालक यांच्याविरूद्ध अमली पदार्थ तस्करी व अपघातास कारणीभूत ठरल्याचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल केला असल्याची माहिती इंदापूर वरिष्ठ पोलीस निरिक्षक तय्यब मुजावर यांनी दिली.

अपघातग्रस्त टोयटा कार ही पांढर्‍या रंगाची (आर.जे.०६, सी.ई.९२२८) आहे. तिथे आढळलेली कार ही गुजरात पासिंगची आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, तुकाराम महाराज पालखी मुक्काम इंदापुरात असल्याने इंदापूर पोलीस प्रशासनाकडून पेट्रोलिंग चालु होते, नाईट राऊंड तसेच बंदोबस्त पाॅइंट चेक करत असताना इंदापूर पोलीसांना मिळालेल्या माहितीवरून महात्मा फुले चौक सर्कल नजिक सर्विस रोडलगत एक टोयटा कार अपघातग्रस्त बेवारस स्थितीत असल्याचे समजले. सदर ठिकाणी इंदापूर पोलिसांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता अपघातग्रस्त कारच्या मागील बाजुकडून अतिशय उग्र वास येत असल्याचे जाणवले.

पोलिसांनी सदर कारची पंचासमक्ष तपासणी केली असता कारच्या मागील बाजुच्या डीक्कीत शासनाने बंदी घातलेला अंमली पदार्थ गांजा असल्याचे आढळून आले. सदरची कार ही मुद्देमालासह जप्त करून त्यातील गांजा या अंमली पदार्थाचे मोजमाप केले असता त्याचे वजन २८.५ किलो इतके भरले. त्याची शासकीय नियमानुसार ६ लाख रूपये इतकी किंमत आहे. तर अपघातग्रस्त टोयटा कारची किंमत १२ लाख होत असून ६ लाख रूपये किंमतीच्या गांजासह एकुण १८ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही इंदापूर वरिष्ठ पोलीस निरिक्षक तय्यब मुजावर, सहाय्यक पोलीस निरिक्षक नागनाथ पाटील, ज्ञानेश्वर धनवे, महेश माने, दाजी देठे, सहा. फौजदार नितिन तांबे, युवराज कदम, पोलीस नाईक जगदिश चौधर, बापू मोहिते, सलमान खान, मोहम्मदअली मड्डी, विशाल चौधरी, विकास राखुंडे या पथकाने केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीIndapurइंदापूर