शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा २०१९ : दोन्ही काँग्रेसला माहिती नाही ‘मित्र’ कोण..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 12:05 IST

आघाडीचा मित्रपक्ष कोण? हेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांच्या शहराध्यक्षांना माहिती नाही

पुणे : आघाडीच्या जागावाटपामध्ये कोथरूड विधानसभा मतदारसंघ मित्र पक्षाला सोडण्यात आला आहे; पण पुण्यात आघाडीचा मित्रपक्ष कोण? हेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांच्या शहराध्यक्षांना माहिती नाही. आघाडीचा पुण्यातील मित्रपक्ष कोण? हे अद्याप ठरले नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी सांगितले; तर पुण्यातील जागावाटपाची घोषणा प्रदेशाध्यक्ष करतील, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी येथे स्पष्ट केले.शहरातील आठही विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आघाडीच्या सर्व पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक सोमवारी (दि.२३) काँग्रेस भवन येथे पार पडली. यावेळी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आजी-माजी आमदार, नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर पत्रकारांशी बोलताना तुपे आणि बागवे यांनी आघाडीचा शहरातील मित्रपक्ष कोण, हे अद्याप माहीत नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुण्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या जागा लढविणार असल्याचे सांगितले होते. अजित पवार यांच्या घोषणेनंतर काँग्रेसच्या काही नेत्यांनी या जागावाटपाला विरोध केला. यावर बागवे यांनी सांगितले की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असून, कोणी उमेदवार दिला, तरी दोन्ही पक्ष आघाडीचा धर्म पाळणार आहेत. दरम्यान, याबाबत तुपे यांनी सांगितले की, पदाधिकाऱ्यांच्या  बैठकीत निवडणुकीच्या प्रचाराचे नियोजन करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकासाठी शहर पातळीवर आणि प्रत्येक मतदारसंघासाठी स्वतंत्र समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्यानंतर लवकरच आघाडी आणि मित्रपक्ष यांचा एकत्र मेळावा घेण्यात येणार आहे, तर जागावाटपाबाबत विचारले असता, तुपे यांनी सांगितले की, दोन्ही पक्षांमध्ये कार्यकर्त्यांचे मोठे जाळे असून, सर्वच मतदारसंघांत पक्षांच्या इच्छुक उमेदवारांची संख्यादेखील अधिक आहे. यामुळे हा मतदार सोडा, हा मतदारसंघ आम्हाल द्या, अशी मागणी तर होणारच आहे; परंतु याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. ........आबा बागुल यांची बैठकीकडे  पाठ पर्वती लढण्याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली; परंतु पर्वती विधानसभा मतदारसंघावर काँगे्रसने आपला दावा सांगितला असून, येथे पक्षाचे ज्येष्ठे नेते व नगरसेवक आबा बागुल तीव्र इच्छुक आहेत. पवार यांच्या घोषणेमुळे आबा बागुल प्रचंड नाराज झाले आहेत. यामुळेच या बैठकीकडे बागुल यांनी पाठ फिरवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. 

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभा