शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; पंतप्रधान मोदींनीही केलं खासदाराचं कौतुक!
4
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
5
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
7
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
8
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
9
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
10
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?
11
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
12
टी-२० क्रिकेटमध्ये आता विराटआधी वॉर्नरचं नाव घेतलं जाईल; द हंड्रेड स्पर्धेत गाठला मोलाचा टप्पा!
13
कंगाल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची संपत्ती किती! कशी करतात कमाई?
14
१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती?
15
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
16
Angaraki Chaturthi 2025: अंगारकी सहा महिन्यातून एकदा येते; आज 'हा' उपाय करायला विसरू नका!
17
विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना
18
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
19
Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके
20
रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...

Vidhan Sabha 2019 : कसब्यावरचा झेंडा कायम राहणार का..? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 07:00 IST

कसब्यात शिवसेनेकडून होत असलेली बंडखोरी ही आणखी एक लक्षणीय बाब आहे..

ठळक मुद्देभाजपाचा बालेकिल्ला सर करणारच याचा विश्वास

पुणे : भारतीय जनता पार्टीने  महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी देऊन कसबा विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली आहे. आता अन्य पक्षांच्या उमेदवारांच्या नावाची उत्सुकता असून त्यावरून या मतदारसंघात चुरस होईल किंवा नाही हे ठरणार आहे. उमेदवारीबाबत बोलताना मुक्ता टिळक म्हणाल्या, पक्षाने मी आतापर्यंत केलेल्या कामाचे चीज केले अशी भावना झाली आहे. त्याप्रमाणे यातून टिळक घराण्याचाही मान ठेवण्यात आला आहे. सलग ४ वेळा मी या भागातून नगरसेवक म्हणून निवडून आले. महापौर म्हणून गेली अडीच वर्षे काम केले. त्या सगळ्याचा उपयोग निश्चितपणे होईल अशी खात्री आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते एकदिलाने कामाला लागले असून भाजपाचा बालेकिल्ला सर करणारच याचा विश्वास आहे.टिळक यांची उमेदवारी भाजपाकडून जाहीर झाली असली तरी अद्याप अन्य पक्षांचे, त्यातही आघाडीमध्ये काँग्रेसकडे आलेल्या या मतदारसंघातील त्यांचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. पक्षाचे पालिकेतील गटनेते अरविंद शिंदे, माजी महापौर कमल व्यवहारे तसेच पालिकेतील काँग्रेसचे सहयोगी सदस्य रविंद्र धंगेकर असे तिघेजण काँग्रेकडून इच्छुक आहेत. त्यातील धंगेकर यांनी आतापर्यंत दोन वेळा याच मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली आहे. शिवाय ते स्थानिक रहिवासी आहेत. उमेदवारीसाठी त्यांचे पारडे जड असल्याचे बोलले जाते.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून माजी नगरसेविका रुपाली पाटील-ठोंबरे या इच्छुक आहेत. पक्षाकडून त्यांचेही नाव अद्याप जाहीर झालेले नाही. कसब्यात शिवसेनेकडून होत असलेली बंडखोरी ही आणखी एक लक्षणीय बाब आहे. शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी स्वत:च आपली उमेदवारी जाहीर करत प्रचारही सुरू केला आहे. शिवसेनेला भाजपाने पुण्यात विधानसभेची एकही जागा सोडली नसल्याचा निषेध म्हणून निवडणूक लढवत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पुण्यातील सर्व शिवसैनिक कसबा मतदारसंघावर भगवा फडकवतील असे ते म्हणाले. .........................................................................................................................................................................................................................................                                                                                                                                 

टॅग्स :Puneपुणेvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMukta Tilakमुक्ता टिळकPoliticsराजकारण