शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

Vidhan Sabha 2019 : बारामतीत भाजपकडून पुन्हा जातीचे कार्ड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 14:24 IST

धनगर समाजाचे फायरब्रॅँड नेते असलेल्या गोपीचंद पडळकर बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांना आव्हान देणार आहेत.

ठळक मुद्देशिवसेना तटस्थ : बारामतीच्या जातीच्या गणितात धनगर समाजाची मते लक्षणीयलोकसभा निवडणुकीत यांना पडळकर २ लाख ५८ हजार मते

बारामती : बारामतीमध्ये २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील चमत्कार पुन्हा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने यावेळीही जातीचे कार्ड खेळण्याची रणनीती आखली आहे. धनगर समाजाचे फायरब्रॅँड नेते असलेल्या गोपीचंद पडळकर बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांना आव्हान देणार आहेत. मात्र, ही जागा आपल्या वाट्याला असून आयात  उमेदवारामुळे विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करीत शिवसेनेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. महादेव जानकर यांनी २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांना चांगली लढत दिली होती. तोच फॉर्म्युला पुन्हा वापरण्याची भाजपची खेळी आहे. बारामतीच्या जातीच्या गणितात धनगर समाजाची मते लक्षणीय आहेत. धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर पडळकर यांनी आवाज उठविला  होता. मात्र, लोकसभा निवडणुकीत त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा झेंडा हाती घेत   सांगली लोकसभा निवडणूक लढवली होती. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमध्ये पडळकर यांनी सर्वाधिक २ लाख ५८ हजार मते मिळविली होती. ते विधानभेसाठी जत अथवा खानापूर मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. बारामती विधानसभा मतदारसंघाच्या आजपर्यंतच्या इतिहासात निवडणूक लढविणारे पडळकर हे धनगर समाजाचे पाचवे उमेदवार आहेत. यापूर्वी १९७२ मध्ये  शरद पवार यांच्याविरोधात जनता पक्षाची उमेदवारी मिळवून विजय मोरे यांनी निवडणूक लढविली होती. १९८० मध्ये शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून समाजवादी काँग्रेसमधून निवडणूक लढविली होती. त्यावेळी मारुतराव चोपडे त्यांच्याविरोधात लढले होते. १९९० मध्येदेखील चोपडे यांनी पवार यांच्याविरोधात अपक्ष निवडणूक लढविली होती. १९९१ मध्ये अजित पवार यांनी प्रथमच विधानसभा निवडणूक लढविली. यावेळी अजित पवार यांच्याविरोधात हनुमंत कोकरे यांनी निवडणूक लढविली होती. त्यानंतर थेट २०१४ मध्ये  बाळासाहेब गावडे यांनी अजित पवार यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती. रासपचे जिल्हाप्रमुख संदीप चोपडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, की रासपचे कार्यकर्ते भाजप उमेदवार देईल त्या उमेदवाराचे काम करू. बारामतीत रासपची ताकद मोठी आहे................उमेदवार आयात करू नयेदरम्यान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. राजेंद्र काळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, भाजपने उमेदवार आयात करू नये. गोपीयुतीमध्ये भाजपला बारामतीची जागा गेल्यास मित्रपक्षाचा धर्म निश्चित पाळू. मात्र, शिवसेनेकडे जागा आल्यास निवडणूक लढविण्याची तयारी पूर्ण आहे...........पडळकर यांची व्हिडीओ क्लिप व्हायरलपडळकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यावर त्यांनी लोकसभा निवडणुकीच्यादरम्यान केलेल्या भाषणाची क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये ते म्हणतात, ‘‘भारतीय जनता पक्षाने धनगर समाजाला आरक्षण दिलेले नाही. त्यामुळे मी, माझी आई, माझे भाऊ भाजपकडून उभे राहिले तरी मतदान द्यायचे नाही. बिरोबाची शपथ आहे.’’ 

टॅग्स :BaramatiबारामतीGopichand Padalkarगोपीचंद पडळकरAjit Pawarअजित पवारElectionनिवडणूकBJPभाजपा