शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

Video: पुण्यातील ७५ वर्षीय आजोबा गच्चीवर भरवतात ३० वर्षांपासून पक्षांची 'शाळा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2020 11:10 IST

३० वर्षांपासून भरणाऱ्या या शाळेला चाळीसहून अधिक प्रजातीचे पक्षी देतात भेट...

ठळक मुद्देफळ, फुलझाडं लावल्यास वाढते संख्या; पाण्याची करावी सोय 

श्रीकिशन काळे - 

पुणे : वय वर्षे ७५...तरी गच्चीवर शंभरहून अधिक झाड-रोपं बहरत आहेत. त्यांना रोज पहाटे पाच वाजता उठून ते पाणी घालतात. कारण तिथे चाळीसहून अधिक प्रजातीचे पक्षी भेट देण्यासाठी येतात. पक्ष्यांच्या प्रेमापोटी ती झाडं त्यांनी तशीच ठेवली आहेत, त्याला फळ आले तरी ते पक्ष्यांसाठी ठेवतात, या पक्षीप्रेमीचे नाव आहे नंदू कुलकर्णी. 

गेली अनेक वर्षांपासून त्यांनी आपल्या गच्चीवर छानशी बाग फुलवली आहे. दररोज पक्षी येत असल्याने त्यांचा दिवस आनंदात जातो आणि ते फुल, फळ असे झाडं लावून जणूकाही त्या पक्ष्यांचे घरच जोपासत आहेत.

गार्डन एक्सपर्ट नंदू कुलकर्णी हे ‘निसर्ग संवाद’नावाची संस्थाही चालवतात. त्याद्वारे पर्यावरण संवर्धन, पाणी बचत, प्रदूषण कमी करणे आदी विषय शिकवतात पक्ष्यांविषयी त्यांना खूप जिव्हाळा असल्याने एक मोठे मातीचे पाण्याचे पसरट भांडे ठेवले आहे. त्यात अनेक पक्षी येऊन स्नान करतात. एका शिंप्याने त्यांच्याकडील एका छोट्या झाडाच्या पानांमध्ये घरटं बांधले आहे. त्यात पिल्लं मोठी होत आहेत. करवंद, चिकू, डाळिंब अशी फळझाडं मोठ्या कुंडीत बहरत आहेत. तर फुलझाडं देखील आहेत.  

पक्ष्यांना अन्नधान्य टाकू नये आजकाल प्राणी, पक्ष्यांवर प्रेम दाखवण्यासाठी अनेकजण त्यांना खायला घालतात. पण पक्ष्यांचे खाद्य हे ते स्वत: शोधतात. त्यांना आपण सवय लावू नये. काही पक्षी बिया खातात, फळं खातात ते त्यांना मिळते. आपण फक्त त्यांना पाणी द्यावे, इतर धान्य वगैरे टाकू नये, असा सल्ला नंदू कुलकर्णी यांनी दिला. 

  चाळीस प्रजातीच्या पक्ष्यांची भेट साळुंकी, दयाळ, टोपीवाला, लाल गाल्या बुलबुल, लालबुड्या बुलबुल, चष्मेवाला, कोतवाल, शिंजीर, शिंपी, राखी वटवट्या, तांबट, हळद्या, वेडा राघू, जांभळा सूर्यपक्षी असे असुमारे ४० प्रकारचे पक्षी या गार्डनमध्ये येतात.

टॅग्स :Puneपुणेbirds sanctuaryपक्षी अभयारण्यenvironmentपर्यावरणNatureनिसर्ग