नीरा : गुळूंचे (ता.पुरंदर) येथील रायबाचामळा येथील राहत्या घराच्या अंगणात वीज पडली. संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान कडक्याच्या आवाजात वीज पडल्याने घरांना हादरे बसले. परिसरातील घरातील लोकांना वीजेचा झटका बसला, पण कोणतेही गंभीर नुकसान झाले नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. याचे मोबाईल मध्ये चित्रीकरणही झाले. मागील महिन्यातही शेजारच्या गावातीलच कोंडेवाडी येथेही नारळाच्या झाडावर वीज पडून झाडाने पेट घेतला होता. गुळुंचे येथील रायबाचामळा येथे वीज पडली. आज शनिवारी सायंकाळी ढग दाटून आले होते. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली होती. याचे व्हिडीओ मोबाईलद्वारे संजय बबन निगडे करत होते. याच दरम्यान अचानक वीजेचा गोळा अंगणात येताना मोठा आवाज झाला.
Video : गुळूंचे येथील रायबाचामळा येथे घराच्या अंगणात पडली वीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 21:23 IST
वीज पडण्याचा व्हिडीओ मोबाईलमध्ये झाला कैद
Video : गुळूंचे येथील रायबाचामळा येथे घराच्या अंगणात पडली वीज
ठळक मुद्देवीज पडण्याचा व्हिडीओ मोबाईलमध्ये झाला कैद