शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Video: पुणे विमानतळावर प्रवाशांचे आंदोलन; १० तास विलंब, ३ प्रवाशांना CISF जवानांनी उचलून नेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 17:08 IST

कोणाला दवाखान्यात, कोणाला मीटिंगला तर काही जणांना मुलाखतीसाठी जायचे असताना विमानाला १० तास विलंब झाल्याने प्रवाशांना मनस्ताप

पुणे : बंगळुरूला जाणारे एअर एशियाचे विमान सकाळी साडेपाच वाजता असल्यामुळे प्रवासी पहाटे तीन वाजल्यापासून पुणेविमानतळावर आले होते. पण दुपारी तीन वाजेपर्यंत विमानच न आल्यामुळे प्रवाशांना सुमारे दहा तास विमानतळावर ताटकळत रहावे लागले. त्यानंतर दुपारी तीन वाजताचे जयपूरला जाणारे विमान बंगळुरूच्या प्रवाशांना देण्यात आले. त्यामुळे जयपूरला जाणाऱ्या प्रवाशांनाही काही तास मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे प्रवाशांनी विमानतळावर गोंधळ घालत विमान कंपनीचा निषेध केला. जयपूरच्या विमानाला विलंब झाल्यामुळे ४ नंबरच्या गेटवर आंदोलन करणाऱ्या तीन प्रवाशांना सी आय एस एकच्या जवानांनी ताब्यात घेतले. प्रवाशांना अक्षरश: उचलून नेण्यात आले आहे.

सकाळी साडेपाच वाजता विमान असल्यामुळे प्रवासी पहाटे विमानतळावर पोहोचले. विमान वेळेवर न आल्यामुळे त्यांनी काही काळ वाट पाहिली. मात्र, एक-दोन तासानंतर प्रवाशांनी विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली. ठोस उत्तर न मिळाल्यामुळे प्रवाशांनी जाब विचारला. कोणाला दवाखान्यात, कोणाला मीटिंगला तर काही जणांना मुलाखतीसाठी जायचे होते. या सर्व प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. सुमारे दहा तास हे प्रवासी विमानतळावर अडकले होते. अखेर विमान कंपनीने जयपूरला जाणारे दुपारी २.५५ वाजताचे विमान बंगळुरूला पाठवण्याचा निर्णय घेतला. प्रवाशांनी यावेळी एअर एशियाच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केली. जयपूरचे विमान बंगळुरूला पाठविल्यामुळे जयपूरचे प्रवासी रखडले. जयपूरच्या प्रवाशांनी भुवनेश्वरला जाणारे विमान जयपूरला सोडण्याची मागणी केली. मात्र जयपूरला साडेपाच शिवाय विमानच नसल्याचे विमान कंपनीने ऐनवेळी सांगितले. त्यामुळे प्रवाशांनी विमानतळावर घोषणाबाजी केली. विमान कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, विमानात बिघाड झाल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. आम्ही लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था करत आहोत. विमान कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, विमानात बिघाड झाल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. आम्ही लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था करत आहोत.

माझे वडील मरणाच्या दारात...

जयपूरला जाणाऱ्या विमानाला उशीर झाल्यानंतर एक तरुणी धाय मोकलून रडताना दिसली. ती म्हणाली, माझे वडील दवाखान्यात ॲडमिट असून मरणाशी झुंज देत आहेत. विमानच नसल्यामुळे मी आता कशी जाणार?

टॅग्स :Puneपुणेpune airportपुणे विमानतळairplaneविमानpassengerप्रवासीtourismपर्यटन