शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO| जिवाची पर्वा न करता एसटीच्या चालक-वाहकाने आग विझवून प्रवाशांना वाचवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 19:34 IST

इंदापूर जवळील घटना, दुर्घटना टळली...

इंदापूर (पुणे) : शिवशाही बसला लागलेली आग चालक व वाहकाच्या प्रसंगावधानाने विझवण्यात यश मिळाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लोंढेवस्तीच्या हद्दीत बुधवारी (दि.१७) सकाळी पावणेदहा वाजता हा प्रकार घडला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, चालक शिवाजी तुळजाराम पऊळ हे आपल्या ताब्यातील तुळजापूर-पुणे ही शिवशाही बस (एमएच ०९ इएम १३८२) घेऊन पुण्याकडे निघाले होते. कर्मयोगी कारखान्यांपर्यंत आल्यानंतर एक ट्रक बसला ओलांडून जात असताना बसची पाठीमागील चाके जाम झाल्याचे व धूर येऊ लागल्याचे पऊळ याच्या लक्षात आले.

त्यांनी वाहक ज्ञानोबा बबन भिसे यांनी खात्री करण्यास सांगितले. मागील चाकाचे लायनर धूर निघत असल्याचे दिसून आल्यानंतर या दोघांनी बसमधील प्रवाशांना खाली उतरवले. त्यानंतर काही क्षणात बसची पाठीमागील बाजू पेटली. प्रसंगावधान राखून चालक वाहकांनी बसचे दोन्ही बंब फोडले व ते आग विझवू लागले. तेथून जाणाऱ्या ट्रकचालकाने दोन बंब दिले. अग्निशामक दलाला बोलावण्यात आले.

या सर्वांच्या मदतीने आग आटोक्यात आली. प्रवाशांना कसली ही झळ बसली नाही. बसचे किरकोळ नुकसान झाले. इंदापूरचे आगार व्यवस्थापक मेहबूब मणेर व एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळास भेट दिली आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी