शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Video: पायी चालणेही झाले मुश्किल! छत्रपती शिवाजी रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून सुटका होणार तरी कधी?

By राजू इनामदार | Updated: June 14, 2025 20:30 IST

नवा पूल, मंगला टॉकीज, शनिवार वाडा, दगडुशेठ गणपती ते मंडई, ते गाडीखाना, बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यान, शनिपार चौक, अप्पा बळवंत चौक ते शनिवार वाडा प्रचंड वाहतूककोंडी

पुणे: आठवड्यातील सुटीचे दिवस, चतूर्थी, गणेशजन्म अशा दिवशी छत्रपती शिवाजी रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीतूनपुणेकरांची सुटका व्हावी म्हणून प्रशासन काही करणार आहे की नाही असा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या कसबा विभागाने यासंबधी महापालिका, वाहतूक शाखा यांना निवेदन देऊन आता काहीतरी करा अशी मागणी केली आहे.

या विभागाचे अध्यक्ष गणेश नलावडे यांनी सांगितले की, या रस्त्यावरून प्रवास करायचा, तोही शनिवार रविवार किंवा कोणत्याही सुटीच्या दिवशी व चतुर्थी व गणपतीशी संबधित दिवशी म्हणजे निव्वळ कसरत झाली आहे. नवा पूल, मंगला टॉकीज, शनिवार वाडा, दगडुशेठ गणपती ते मंडई, ते गाडीखाना, बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यान, शनिपार चौक, अप्पा बळवंत चौक ते शनिवार वाडा थोडक्यात जवळपास संपूर्ण छत्रपती शिवाजी रस्ता वाहतूकीने इतका गच्च होते की पायी चालणेही मुश्किल होते. हे सगळे दिसत असूनही जुजबी उपाययोजना करण्यापलिकडे गेल्या काही वर्षात प्रशासनाकडून काहीही झालेले नाही. त्यांना त्याचे काहीही वाटत नाही.

पुणेकरांचे हाल लक्षात घेऊन वाहतूक शाखेने कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. प्रामुख्याने लाल महाल चौक, बुधवार चौक, दत्त मंदिर चौक या ठिकाणी नियोजन करणे गरजेचे आहे. सदर रस्त्यावर फरासखाना व विश्रामबाग पोलीस स्टेशन असुन देखील वाहतुकीची ही परिस्थिती आहे. प्रत्यक्षात वाहतूक कोंडीच्या काळात या चौकांमध्ये साधे पोलिसही नसतात, त्यामुळे ज्याला जसे वाटेल तसे वाहन पुढे काढले जाते व कोंडी निर्माण होते असे नलावडे म्हणाले. या विषयावर अन्य राजकीय पक्ष, स्थानिक संस्था, संघटना यांनीही आवाज उठवावा असे आवाहन नलावडे यांनी केले आहे.

टॅग्स :PuneपुणेDagdusheth Templeदगडूशेठ मंदिरTrafficवाहतूक कोंडीPoliceपोलिसSocialसामाजिकcarकारbikeबाईक