शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

प्रज्ञासिंहचा विजय चिंताजनक : ‘ दक्षिणायन’ चे आवाहन अजूनही कायमच : डॉ. गणेश देवी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 13:09 IST

सत्ता कोणाचीही असो देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायम राहिले पाहिजे..

ठळक मुद्देअभिव्यक्तीचा संकोच होता कामा नयेसामाजिक, सांस्कृतिक भूमी तयार करणे हे वेळ घेणारे काम

पुणे : सत्ता कोणाचीही असो देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायम राहिले पाहिजे. ‘दक्षिणायन’ ने त्यावेळी केलेल्या ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होता कामा नये, तो होतो आहे असे वाटत असेल तर विरोध करा’ हे आवाहन अजूनही कायमच आहे असे दक्षिणायन संस्थेचे प्रमुख, प्रसिद्ध भाषा अभ्यासक डॉ. गणेश देवी यांनी सांगितले.लोकसभा निवडणूकीच्या आधी देशभरातील काही प्रसिद्ध कलावंत, लेखक यांनी डॉ. देवी यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या दक्षिणायन संस्थेच्या वतीने एक आवाहन करण्यात आले होते. त्यात त्यांनी सध्याच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होत आहे, डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश, एम. एम. कलबुर्गी अशा विचारवंतांच्या हत्या होत आहेत, त्यामुळे आताच्या सत्तेला विरोध करावा अशा आशयाचे आवाहन केले होते. त्यावरून बराच गदारोळ झाला व प्रत्युत्तर म्हणून देशातील अन्य काही कलावंत लेखक यांनी सध्याच्या सत्ताधाऱ्यांना मतदान करा असेही आवाहन केले होते.दक्षिणायन संस्थेच्या आवाहनाला लोकांकडून कमी प्रतिसाद मिळाला असे डॉ. देवी यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘आमचे आवाहन अजूनही कायम आहे. कारण झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवरच ते केले होते व परिस्थितीत अजूनही काही फरक पडला असे वाटत नाही. लोकांकडून कमी प्रतिसाद मिळाला हे खरे असले तरीही त्याची कारणे वेगळी आहे. समाजमाध्यमांनी तयार केलेली पंतप्रधान नरेंद्री मोदी यांची प्रतिमा, देशातील बहुसंख्य इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे सत्ताधाऱ्यांबरोबर झालेले साटेलोटे व फक्त भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये आलेली ‘एक्स्ट्रिीम राईट’ची लाट (उजव्या विचारसरणीचे कट्टरतावादी) यामुळे भारतीय मतदार प्रभावी होऊन हे झाले असावे. देशामध्ये पुलवामा व बालाकोट यानंतर देशात देशभक्तीची लाट उसळवली गेली. मात्र असे असले तरी दक्षिणायन चे आवाहन अजूनही कायम आहे. लोकांना सातत्याने सांगत रहावे लागते व देशातील विचारवंतांचे ते कामच आहे असे डॉ. देवी म्हणाले.प्रसिद्ध लेखक गणेश विसपुते हेही या आवाहनात सहभागी होते. ते म्हणाले, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची लढाई ही दिर्घ पल्ल्याची लढाई असते. आता निकाल असा लागला असला तरी म्हणून त्याचा अर्थ आम्ही चुकीचे होतो असा होत नाही. सामाजिक, सांस्कृतिक भूमी तयार करणे हे वेळ घेणारे काम असते. त्यात सध्या माहितीचा इतका मारा होत असतो की त्यात समाजमन गोंधळून जाते. तसे होईल अशी स्थिती देशात नक्कीच निर्माण झाली होती. दोन अधिक दोन चार असे पक्के उत्तर या लढाईत येत नाही. इतका मोठा विजय झाला तर जनतेने रस्त्यावर येऊन जल्लोष का केला नाही. याआधी जनता पार्टी व त्यानंतर इंदिरा गांधी यांचा विजय झाला त्यावेळी तो जनतेने साजरा केला. यावेळी तसे दिसले नाही. त्यामुळे आवाहनाला प्रतिसाद मिळाला नाही किंवा कमी मिळाला असे म्हणजे योग्य की अयोग्य यात जाण्यात अर्थ नाही. आमचे म्हणणे आम्ही मांडतच राहणार आहोत.मुंबईस्थित आनंद पटवर्धन म्हणाले, मीही त्या आवाहनात होतो. घटनाच तशा घडत होत्या. विचारवंतांच्या हत्या होत होत्या, नाट्यप्रयोगांना, चित्रपटांना बंदी घालण्याची भाषा होत होती. अशा वेळी असे आवाहन करावेच लागते. लेखक मेला आहे असे लेखकाला म्हणावे लागते याला वातावरण चांगले आहे असे कसे म्हणता येईल. अशा वेळी एक कलावंतांची जी जबाबदारी असते ती पार पाडणे महत्वाचे असते. निवडणूक निकाल असे लागले याचा अर्थ कोणी आमचे ऐकले नाही असा काढता येणार नाही किंवा आम्ही आमचे म्हणणे मांडणे बंद करू असाही नाही. आमचे काम आम्ही केले. ते करतच राहणार आहोत. .......

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकार