पीसीएलटीए, एमडब्लूटीए, टेनिसनट्स रॉजर संघांचे विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:19 IST2021-03-13T04:19:23+5:302021-03-13T04:19:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : फर्ग्युसन कॉलेज टेनिस अकादमी व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए)तर्फे आयोजित तिसऱ्या कुडो ...

Victory of PCLTA, MWTA, Tennessee Roger teams | पीसीएलटीए, एमडब्लूटीए, टेनिसनट्स रॉजर संघांचे विजय

पीसीएलटीए, एमडब्लूटीए, टेनिसनट्स रॉजर संघांचे विजय

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : फर्ग्युसन कॉलेज टेनिस अकादमी व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए)तर्फे आयोजित तिसऱ्या कुडो इंडिया सांघिक आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत साखळी फेरीत पीसीएलटीए, एमडब्लूटीए आणि टेनिसनट्स रॉजर या संघानी आगेकूच केली.

फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे आठवड्याच्या दर शनिवार व रविवार खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत गटसाखळी फेरीत इ गटात रवी जौकनी, निर्मल वाधवानी, नंदू रोकडे, विशाल साळवी यांच्या अफलातून कामगिरीच्या जोरावर पीसीएलटीए संघाने एसपी १ संघाचा १७-१६ असा संघर्षपूर्ण पराभव करून विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात ड गटात एमडब्लूटीए संघाने सोलारिस डायनामोजचा २४-०० असा एकतर्फी पराभव करत दुसरा विजय मिळवला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल : गटसाखळी फेरी

गट इ : पीसीएलटीए वि.वि. एसपी वन १७-१६, १०० अधिक गट :प्रवीण घोडे-राजेश मित्तल पराभूत वि. गजानन कुलकर्णी-आशिष डिके १-६; ९० अधिक गट : रवी जौकनी/निर्मल वाधवानी वि.वि. उमेश भिडे/श्वेतल शहा ६-१;

खुला गट : नंदू रोकडे-विशाल साळवी वि.वि. इशा घैसास-संतोष शहा ६-३;

खुला गट : कल्पेश मकणी-अनंत गुप्ता पराभूत वि. आदित्य जोशी-साहिल खरे ४-६;

गट ड : एमडब्लूटीए वि.वि. सोलारिस डायनामोज २४-००, १०० अधिक गट : प्रवीण पांचाळ-सुमंत पॉल वि.वि. रवी बांदेकर/मंदार काळे ६-०;

९० अधिक गट : राजेश मकणी-नीलेश ओस्तवाल वि.वि. दीपक दिसा-दीपू गलगली ६-०;

खुला गट : मंदार वाकणकर-सुमंत पॉल वि.वि. कुणाल पुराणिक-यशराज उभे ६-०;

खुला गट : श्याम पेडणेकर-विवेक खडगे वि.वि. संतोष दळवी-दयानंद देशपांडे ६-०;

गट इ : टेनिसनट्स रॉजर वि.वि. डेक्कन ऍव्हेंजर्स २१-१२, १०० अधिक गट : अनिल कोठारी-रवी कोठारी पराभूत वि. नितीन जोशी-सचिन आराध्ये ३-६;

९० अधिक गट : सुधीर पिसाळ-एस. कन्नन वि.वि. संजय कामत-विद्याधर हुमनाबादकर ६-५ (७-३);

खुला गट : वेंकटेश एस-नितीन सावंत वि.वि. रितू ओक-आनंद कोटस्थाने ६-१;

खुला गट : जॉय बॅनर्जी-भूषण कुमार वि.वि. सचिन आराध्ये-मंगेश प्रभुदेसाई ६-०

------

फोटो - जेएमएडीट

Web Title: Victory of PCLTA, MWTA, Tennessee Roger teams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.