शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

महाराष्ट्रात विजय युतीचाच ; निश्चित आकडा सांगण्यास मात्र आदित्य ठाकरेंचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 12:56 IST

सध्या सर्वत्र एकच हवा, एकच रंग आणि एकच भगवा भगवा दिसत असून विजय युतीचाच होणार आहे.

पुणे : महाराष्ट्रात सध्या युतीचीच हवा असून आमचाच विजय होणार आहे असा विश्वास युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुण्यात व्यक्त केला.मात्र निश्चित आकडा सांगण्यास त्यांनी नकार दिला. शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी युतीचे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला. यावेळी नरपतगिरी चौकामध्ये महायुतीकडून सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला पालकमंत्री गिरीश बापट, शिवसेना उपनेत्या नीलम गोरे, आमदार बाबुराव पाचर्णे, आमदार महेश लांडगे, आमदार सुरेश गोरे, जि. प. गटनेत्या आशा बुचके, सुलभा उबाळे, अनिल देसाईउपस्थित  होते. सभेनंतर अर्ज भरताना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते.पुढे ते म्हणाले की,आमचा संपूर्ण महाराष्ट्रात फॉर्म भरायला जायचा प्रयत्न आहे.शिवाय प्रचार तर सुरू आहेच.सध्या सर्वत्र एकच हवा, एकच रंग आणि एकच भगवा भगवा दिसत असून विजय युतीचाच होणार आहे.शिरूरमधील बैलगाडी शर्यतीच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, बैलगाडीचा मुद्दा आहेच पण पहिला मुद्दा धनुष्यबाण आणि कमळाचा आहे. आणि मग त्यानंतर इतर वचन पूर्ण करु असे आश्वासन द्यायलाही ते विसरले नाहीत.मात्र प्रत्यक्ष सभेत ठाकरे यांनी हजेरी न लावल्याने कार्यकर्त्यांची मात्र निराशा बघायला मिळाली. 

टॅग्स :PuneपुणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा