शहरं
Join us  
Trending Stories
1
"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात; 11 मतदारसंघ, तापमान कमी होणार
3
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
4
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
5
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
6
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
7
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
8
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
9
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
10
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
11
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
12
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
13
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
14
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
15
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
16
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
17
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
18
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
19
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
20
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 

पीडित महिलेची डीएसकेंविरोधात दिवाणी न्यायालयात धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 4:47 PM

डीएसकेंच्या कंपनीत केली होती ४० लाख रुपयांची गुंतवणूक

ठळक मुद्दे४० लाख रुपये व त्यावरीझोप ल व्याज मिळावे, या कारणासाठी पुण्यातील पीडित महिलेने दिली तक्रार ऱ्या

पुणे : हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सध्या येरवडा तुरुंगात असणारे डीएसके ऊर्फ दीपक सखाराम कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीवर एका पीडित महिलेने दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. या महिलेने डीएसकेंच्या कंपनीत ४० लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यावरील व्याज मिळावे, यासाठी तिने दिवाणी न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायाधीश आर. एच. नाथानी यांच्या न्यायालयात हा दावा दाखल करण्यात आला आहे. डीएसके समूहाचे संचालक  दीपक सखाराम कुलकर्णी (वय ७०) आणि त्यांच्या पत्नी हेमंती दीपक कुलकर्णी (वय ६५) यांच्या विरोधात ४० लाख रुपये व त्यावरील व्याज मिळावे, या कारणासाठी पुण्यातील पीडित महिलेने तक्रार दिली आहे. दावा दाखल करणारी महिला घटस्फोटित असून तिच्या मुलीसह शहरात राहते. घटस्फोट मिळवताना मुंबई कौटुंबिक न्यायालयात २०११ मध्ये घटस्फोटाची तडजोड झाली. मुंबई कौटुंबिक न्यायालयात तिच्या पतीने पीडित महिलेला कायमस्वरूपाची एकरकमी पोटगी व तडजोडीची तसेच एकरकमी पोटगी म्हणून ४० लाख रुपये दिले होते. मुलीच्या शिक्षणासाठी व भविष्यात लग्नाच्या खर्चासाठी जास्त पैसे मिळतील व डीएसके समूहाच्या चांगल्या परताव्याच्या आमिषाने पीडित महिलेने मोठ्या विश्वासाने २०१२मध्ये तिने हे पैसे  डीएसके ग्रुपमध्ये गुंतविले होते. डी. एस. कुलकर्णी व त्यांचे कुटुंबीय सध्या पुणे येथील येरवडा कारागृहात असून त्यांच्यावर राज्यात अनेक ठिकाणी फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार डीएसके समूहाच्या काही स्थावर, जंगम मिळकतींचा लिलाव होऊन ठेवीदारांना/गुंतवणूकदारांना पैसे मिळतील, अशी आशा आहे. पैशाची मागणी कायदेशीररीतीने राहावी, यासाठी पीडित महिलेने अ‍ॅड. मिलिंद पवार, अ‍ॅड.  योगेश पवार व अ‍ॅड. अजय ताकवणे यांच्या वतीने पुणे येथील दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांच्या न्यायालयात दिवाणी स्वरूपाचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे अन्वेषण पुणे पोलिसांनी त्या पीडितेचा जबाबही नुकताच नोंदविल्याचे पवार यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेD.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीCourtन्यायालयPoliceपोलिसfraudधोकेबाजीyerwada jailयेरवडा जेल