भाई वैद्य यांची प्रकृती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2018 09:41 AM2018-04-02T09:41:43+5:302018-04-02T09:45:21+5:30

या उपचारांना त्यांचे शरीर फारसे साथ देताना दिसत नाही.

Vetern leader Bhai vaidya suffering from major illness in critical condition | भाई वैद्य यांची प्रकृती चिंताजनक

भाई वैद्य यांची प्रकृती चिंताजनक

पुणे : ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांची प्रकृती आणखीनच खालावल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी भाई वैद्य यांना स्वादुपिंडाचा कर्करोग असल्याचे निदान झाले होते. तेव्हापासून त्यांच्यावर  पुना हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. मात्र, या उपचारांना त्यांचे शरीर हवा तसा प्रतिसाद देत नाही. परिणामी त्यांची प्रकृती आणखी खालावली आहे.

वैद्य यांची आठ महिन्यांपूर्वी अँजिओप्लास्टी झाली होती. तीन आठवडय़ांपूर्वी वैद्य यांना स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या विकारामुळे त्यांना श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत आहे. त्यांच्यावर कार्डिऑक अतिदक्षता विभागात (सीसीयू) उपचार सुरू आहेत. त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले आहे. मात्र, त्यांचे ८९ वर्षांचे वय ध्यानात घेता त्यांचा आजार हा औषधांना सध्या पुरेसा प्रतिसाद देत नाही, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली होती. 

Web Title: Vetern leader Bhai vaidya suffering from major illness in critical condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.